आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी येणारे दूध किती शद्ध, स्वत:च तपासा, जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कंझ्युुमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने (सीजीएसआय) बधवारी (७ डिसेंबर) वाजता ग्राहक तक्रार निवारण शिबिर घेतले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बधवारी सकाळी १० ते यादरम्यान होणाऱ्या या शिबिरात खाद्यपदार्थातील भेसळ कशी तपासावी, यावर या संघटनेचे मानद सचिव मनोहर कामत प्रात्यक्षिकांसह माहिती देणार आहेत.

घरी आणले जाणारे दूध किती शद्ध आहे याची चाचणी घेण्याची पद्धतही शिकवली जाणार आहे. सीजीएसआय ही संस्था केंद्र सरकारची असून ग्राहकांच्या हक्कांबाबत काम करते. खाद्य उत्पादनाबाबत तक्रार असल्यास ग्राहक १८००२२२२६२ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊ शकतात. ग्राहक या कार्यशाळेत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, रेल्वे, परिवहन, खाद्यपदार्थ, वैद्यकीय सेवा, वजनमापातील खोट याबाबत तक्रारी नाेंदवू शकतील. सर्वच कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी या वेळी तक्रार निवारणासाठी उपस्थित राहणार आहेत. शहरातील नागरिक, विद्यार्थी यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई येथील संस्थेच्या समन्वयक विधी शहा यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...