आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध खरेदी दरात एक रुपयाची केली वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या वतीने दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाची वाढ करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. खरेदीदरात वाढ झाली असली तरी, ग्राहकांना याची झळ बसणार नाही.

मराठवाड्यात सध्या औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या वतीने प्रतिलिटर २१ रुपये इतका सर्वाधिक दर दिला जात आहे. शासनाचा दर २० रुपये प्रतिलिटर आहे. शासन व्यवस्थापन खर्च प्रतिलिटर ७० पैशांप्रमाणे देत आहे. दूध संघातर्फे तोच व्यवस्थापन खर्च प्रतिलिटर एक रुपया इतका आहे. दूध संघातर्फे या वर्षभरात कोटी ४९ लाख ६५ हजार ९५३ रुपयांचा नफा कमावण्यात आला. ९० लाख रुपयांचा निव्वळ नफा संघाला मिळाला. यात आयकरापोटी २८ लाख रुपये भरण्यात आल्याची माहिती बागडे यांनी दिली.

आठ हजार स्टील कॅन देणार मोफत
स्वच्छ दूधनिर्मिती योजनेअंतर्गत दूध उत्पादकांसाठी लिटर क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या हजार कॅन खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत ३० लाख रुपये इतकी असून येत्या पंधरा दिवसांत त्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच ज्या संस्था चांगल्या प्रकारे दूध संकलन करतात अशा ६५ संस्थांना संघातर्फे दूध तपासणी यंत्रांचे मोफत वाटप करण्यात येईल. याची किंमत २५ लाख इतकी आहे.