आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलकॉर्नरचा टापू होणार बिझनेस सेंटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टसिटी प्रकल्पात नूतनीकरणातून (रिट्रोफिटिंग) शहरातील भागांचा विकास करणे जिकिरीचे असल्याने पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) अथवा नवीन वसाहत (ग्रीनफील्ड) यापैकी एका पर्यायाचाच विचार केला जाणार असून त्यातही नवीन वसाहतीसाठी सलग २५० एकर जागा उपलब्ध होणे किचकट राहणार असल्याने पुनर्विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील भागांचा विचार सुरू असला तरी मिलकॉर्नरचा ९१ एकरचा परिसर व्यापार-व्यवसाय केंद्र रहिवासी असे संयुक्तरीत्या विकसित करण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत.

स्मार्ट सिटीसाठी शहराचा आराखडा तयार करण्याच्या कामात गुंतलेल्या नाइट फ्रँक-फोर्ट्रेस कंपनीच्या वतीने प्राथमिक आराखडा तयार केला असून त्याबाबत आज कंपनीच्या वतीने मनपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल यांची उपस्थिती होती. पीएमसीचे अधिकारी अजित भोरे यांनी आराखड्याबाबत माहिती दिली पदाधिकाऱ्यांच्या शंकांना उत्तरे दिली. या वेळी पीएमसीच्या वतीने समीर जोशी, पौलोमी सरकार, रिषभ गोएल यांचीही उपस्थिती होती, तर मनपाच्या वतीने शहर अभियंता सखाराम पानझडे कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली यांची उपस्थिती होती.

१३ पर्याय निवडले : आतापर्यंतनागरिक शहरातील नागरिकांशी चर्चा करून शहराचा अभ्यास करून प्राथमिक आराखड्यात नूतनीकरण, पुनर्विकास नवीन वसाहत या श्रेणींसाठी एकूण ५० पर्याय समोर आले होते. त्यातून चाळणी लावून १३ पर्याय निवडण्यात आले आहेत. त्यात नूतनीकरणासाठी १, पुनर्विकासासाठी तर नवीन वसाहत निर्मितीसाठी जागांचा पर्याय समोर आला. यातून आता जनतेची लोकप्रतिनिधींची जनमतचाचणी घेऊन एका पर्यायाची निवड केली जाणार आहे. २० नोव्हेंबरच्या आत जनमत चाचणी घेऊन एक पर्याय एक जागा निश्चित झाल्यावर अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे.

औरंगाबादच्या विकासात पर्यटन हा मोठा भाग राहणार असून त्याला अनुसरूनच आराखडा केल्यास पहिल्या २० शहरांत औरंगाबादची निवड होऊ शकते असे भोरे म्हणाले. दिव्य मराठीने ‘पर्यटनामुळेच होणार स्मार्ट सिटी’ हे वृत्त प्रकाशित केले होते. भोरे यांनी तेच सांगत पुनर्विकासाचा प्रकल्प डीएमआयसी पर्यटनाला जोडणाऱ्या भागातच असावा असे स्पष्ट केले.
गुलमंडीअवघड : पुनर्विकासातगुलमंडी, शहागंज, पुंडलिकनगरसारखे भाग चर्चेत होते. पण गुलमंडीवर मालमत्ता उपलब्ध होणेच अवघड असल्याने पहिल्या टप्प्यात गुलमंडीचा समावेश अवघड आहे. त्याऐवजी मिलकॉर्नर सोयीची वाटत असल्याने त्या भागात करायचे काय याचा एक संकल्प आराखडाही पीएमसीने तयार केला आहे.

घराच्या बदल्यात घरे : गरमपाणीहा झोपडपट्टी भाग असल्याने तेथे पुनर्विकास करताना येथील रहिवाशांना त्यांच्या जागेपेक्षा अधिक आकाराचे घर बहुमजली इमारतींत देता येईल. त्यासाठी नागरिकांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही असे भाेरे यांनी सांगितले. अर्थात किमान ४० टक्के लोकांनी आपला होकार कळवला तरच या प्रकल्पात पुढे जाता येईल हेही त्यांनी नमूद केले.

नदीकिनारा सुशोभित करणार : मिलकॉर्नरच्याया ९१ एकरची पश्चिमेकडील बाजूला खाम नदी वाहते. जवळपास किमीचा नदी किनारा या भागाला लाभला आहे. तेथे नदीकिनाऱ्याचे सुशोभीकरण करून आकर्शक उद्यान अथवा हरित पट्टा विकसित करता येऊ शकते.

कसा आहे भाग?
मिलकॉर्नरचा संपूर्ण परिसर पुनर्विकासासाठी घेता येऊ शकेल. त्यात सिद्धार्थ उद्यान, शेजारी मध्यवर्ती बसस्थानक, टेक्स्टाइल मिलचा परिसर गरम पाणी भाग असा मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडे खाम नदीच्या किनाऱ्यापर्यंतचा ९१ एकरचा परिसर पुनर्विकासासाठी आदर्श कमी कटकटीचा ठरू शकतो.

काय करणार तेथे?
एसटीमहामंडळ बसस्थानकाच्या जागी नवीन व्यापारी संकुलासह बसस्थानक उभारण्याच्या विचारात आहेच. मिलच्या जागेवर हमरस्त्याला लागून बिझनेस सेंटर उभारता येईल त्यात कंपन्यांची मोठ्या उद्योगांची कार्यालये, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, हॉटेल्स संकुल उभारता येईल. वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्र उभारली जातील.