आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM 22 Candidate Short Listed For Corporation Election

मोर्चेबांधणी - एमआयएमचे २२ उमेदवार झाले निश्चित?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील तीनपैकी एका मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला असून किमान ७० वॉर्डांत उमेदवार देण्याचे ठरवले आहे. त्यातील २२ उमेदवार निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
७० वाॅर्डांत उमेदवार द्यायचे असल्याने पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चाचपणी सुरू केली असून महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली गेली नाही तर या महिन्याच्या शेवटी उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एमआयएम या पक्षाबाबतचे सर्व निर्णय हैदराबाद येथील पक्ष मुख्यालयात घेतले जात असले तरी औरंगाबादेत कोणत्या वाॅर्डात कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार आमदार इम्तियाज जलील तसेच जिल्हाप्रमुख जावेद कुरैशी यांना देण्यात आला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

तिकिटासाठी अनेक इच्छुक

एमआयएमने दलित व्यक्तीला महापौर बनवण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वेळीच केली होती. "जयभीम, जय मिम' नाऱ्यामुळे दोन्ही समाजांत सर्वच वाॅर्डांत इच्छुकांची संख्या वाढली आहे. हमालवाड्यामधून माजी नगरसेविका मस्सरत फिरदोस फातेमा एमआयएमकडून इच्छुक आहेत. संजय जगताप भडकल गेटमधून इच्छुक आहेत. काेतवालपुरा गरमपाणीचे अपक्ष विद्यमान नगरसेवक वीरेंद्र जाधव हेसुद्धा भडकल गेट येथूनच प्रयत्नात आहेत. आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी येथून अबू लाला हाश्मी, नेहरूनगरमधून सामाजिक कार्यकर्ते जब्बार खान हे त्यांच्या आई खान बेबीजान यांच्यासाठी प्रयत्नात आहेत.
वॉर्ड क्रमांक ४३ मधून जमीर कादरी, अब्दुल अजिम खान इच्छुक आहेत. बुढीलेनमधून गंगाधर ढगे आपल्या पत्नीसाठी एमआयएमचे तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. वॉर्ड क्रमांक ४६ नवाबपुरा हा सर्वसाधारण असल्याने येथून फिरोज खान प्रयत्नात आहेत.
विधानसभेची लाट कायम राहिल्यास ४० नगरसेवक

विधानसभा निवडणुकीत शहरातील तीन मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवारांनी ४० वाॅर्डांत निर्णायक आघाडी होती. एमआयएमची लाट अजूनही शहरात कायम असल्याचे बोलले जाते. ती लाट अशीच राहिली तर किमान ४० नगरसेवक निवडून येऊ शकतात, असा विश्वास पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी तसेच हैदराबादस्थित नेत्यांनाही आहे.

युतीमुळे वाढतील जागा

एमआयएम या पक्षाने दलित मतदारांना सोबत घेतले होते. तेथे त्यांनी पक्षाकडून पहिले महापौरपद देताना दलित नगरसेवकाचीच निवड केली होती. तसाच प्रयोग औरंगाबादेत केला जाणार आहे. येथे दलित इच्छुकांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिल्यास जास्तीचे नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास नेत्यांना आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेत किमान ५० नगरसेवक या नवख्या पक्षाकड़ून निवडून गेलेच पाहिजे, या दिशेने पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे.