आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमच्या पहिल्या यादीत १५ पदवीधर, रविवारी मध्यरात्री जाहीर केली ४४ नावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीनने (एमआयएम) रविवारी मध्यरात्री ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पंधरा उमेदवार पदवीधर, चार बारावी उत्तीर्ण, तर इतर दहावी, सातवी, चौथी पास आहेत. सुरुवातीपासून पक्ष सुशिक्षित व उच्चशिक्षित उमेदवारंाना संधी देणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, राजकारणात शिक्षणाला दुय्यम स्थान असल्याचे पुन्हा एकदा या ितकीटवाटपावरून स्पष्ट झाले आहे.

एमआयएमची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उच्चशिक्षितांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवार किती खर्च करू शकतो, तो निवडून येऊ शकतो का? या सर्व गोष्टी तपासूनच इच्छुकांना पक्षाने उमेदवारी दिली. वॉर्डनिहाय उमेदवारांची यादी अशी : पद्माकर कांबळे-एमएस्सी, एम.एड. (वॉर्ड क्र. २, भगतसिंगनगर, म्हसोबानगर), नजीब खान हबीब खान- बीएस्सी (वॉर्ड क्र.४, चेतनानगर, राजनगर), आसिफ पटेल रशीद-बीए (वाॅर्ड क्र. ५ वानखेडेनगर), इलियास खान फिरोज खान-बीकॉम (वॉर्ड क्र.१०, रोजेबाग-भारतनगर), मिलिंद शेजवळ- बीए (वॉर्ड क्र.१४, पडेगाव), सय्यद हारुण सय्यद करीम (वॉर्ड क्र.१५, मिटमिटा), मोहंमद अनिख पटेल-दहावी (वॉर्ड क्र. १८, जसवंतपुरा), जावेद कुरेशी-दहावी (वॉर्ड क्र.१९, आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी), सय्यद मतीन-दहावी (वॉर्ड क्र.२०, जयभीमनगर, घाटी परिसर), िहना खान रफिक खान- बीए (वॉर्ड क्र.२१, बुढीलेन, कबाडीपुरा), तस्नीम बेगम रऊफ (वॉर्ड क्र.२२, लोटाकारंजा), सायराबानो अजमल खान- बीए, डीएड (वॉर्ड क्र.२३, चेलीपुरा, काचीवाडा), सरवत फातेमा आरिफ- एमए, बीएड (वॉर्ड क्र.२४, शहाबाजार), मुजीब आलम खान-बारावी (वॉर्ड क्र.२५, गणेश कॉलनी), नर्गिस अंजुम सलीम (वॉर्ड क्र.२६, नेहरूनगर), जहांगीर खान- आठवी (वॉर्ड क्र.२७, शताब्दीनगर), संगीता सुभाष वाघोळे-दहावी (वॉर्ड क्र. ३४, आरतीनगर, मिसारवाडी), समीर साजिद (वॉर्ड क्र.३५, नारेगाव), सुलताना बेगम हनीफ शहा- दहावी (वॉर्ड क्र.३६, नारेगाव, ब्रिजवाडी), नीता भालेराव-बीए (वॉर्ड क्र.३७, चौधरी कॉलनी, चिकलठाणा), हाजी इर्शाद खान- बीकॉम (वॉर्ड क्र.४१, रहेमानिया कॉलनी), अजीम अहेमद खान- बीए (वॉर्ड क्र.४३, शरीफ कॉलनी), अन्सारी साजेदा तब्बसुम- बीए (वॉर्ड क्र.४४, रोशन गेट), सुमय्या मुस्तफा खान (वॉर्ड क्र.४५, कैसर कॉलनी), फेरोज खान- बारावी (वॉर्ड क्र.४६, नवाबपुरा), गंगाधर ढगे (वॉर्ड क्र.४९, भडकल गेट), नसरीन बेगम हमजा खान (वॉर्ड क्र.५०, कोतवालपुरा, गरम पाणी), विकास एडक (वॉर्ड क्र.५२, खडकेश्वर), काजी मोहंमद रियाज जब्बार (वॉर्ड क्र.५४, गांधीनगर, बापूनगर), नासेर खान-सातवी (वॉर्ड क्र.५५, भवानीनगर), मैमुन्निसा बेगम (वॉर्ड क्र.५६, संजयनगर), पठाण अस्मा फिरदोस (वॉर्ड क्र.५८, बारी कॉलनी, इंदिरानगर-दक्षिण), मोहंमद रियाजोद्दीन मजहरोद्दीन (वॉर्ड क्र.५९, इंदिरानगर, दक्षिण बायजीपुरा), मोहंमद अय्युब जहागीरदार (वॉर्ड क्र.६१, अल्तमश कॉलनी), अब्दुल रहीम हनिफ- दहावी (वॉर्ड क्र.६३, आविष्कार कॉलनी), जोहराबी नासेर खान (वॉर्ड क्र.६७, समतानगर), प्रवीण शिंदे- बीए (वॉर्ड क्र.६८, समर्थनगर), इशरत बानू शेख मुश्ताक (वॉर्ड क्र.६९, कोकणवाडी, कोटला कॉलनी), शेख मुन्शी शेख भिकन (वॉर्ड क्र.७९, न्यायनगर), बाबासाहेब सुरडकर-बारावी (वॉर्ड क्र.८४, ज्ञानेश्वर कॉलनी, मुकुंदवाडी), मगन निकाळजे (वॉर्ड क्र.१०१, एकनाथनगर, म्हाडा कॉलनी), रमेश भीमसानी- बीए (वॉर्ड क्र.१०४, बन्सीलालनगर), शबाना फैसल खान- बीए, एलएलबी (वॉर्ड क्र.१०८, हमालवाडा, रेल्वेस्टेशन), फरहीन रिजवान-बारावी (वॉर्ड क्र.१०९, देवानगरी).