आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारनियमनाविरुद्ध उद्रेक, महावितरण कार्यालयात एमआयएमची तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील भारनियमनामुळे नागरिकांच्या मनातील संताप वाढत चालला आहे. भारनियमनाविरुद्ध वाढत चाललेल्या उद्रेकाचे रुपांतर शुक्रवारी महावितरण कार्यालयात तोडफोडीत झाले. भारनियमन बंद करण्यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही त्याचा उपयोग झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या मिल कॉर्नर येथील मुख्य कार्यालयात अक्षरश: धुमाकूळ घातला.
 
महिला सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही लोटालोटी मारहाणीचा प्रकार घडला. त्यात महिला सुरक्षा रक्षक जखमी झाली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिटीचौक पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
 
वीज गळतीचे प्रमाण जास्त असल्याचे कारण पुढे करून महावितरणने शहरात सहा ते साडेनऊ तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्याचा फटका शहरातील लाख ८२ हजार आणि औरंगाबाद परिमंडळातील साडेसात लाख वीज ग्राहकांना बसत आहे. हे भारनियमन बंद करावे, यासाठी राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह उद्योजकांनी पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनातील संताप वाढत चालला आहे. त्याचे रुपांतर शुक्रवारी उद्रेकात झाले. तोडफोडीची माहिती मिळताच सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रथम शिंदे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. त्यांना केके ग्रुपचे किशोर वाघमारे, अकील अहेमद यांनी मदत केली. या वेळी महावितरण कार्यालयास छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला. बकोरिया यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन शमले. केले जाईल, असे गणेशकर म्हणाले. 
 
भाजपचा कार्यकारी अभियंत्याला घेराव 
माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, नगरसेवक शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, राहुल खरात, माजी नगरसेवक महेश माळवदकर आणि नागरिकांनी शुक्रवारी दुपारी कार्यकारी अभियंता जाधव यांना घेराव घातला. भारनियमन १५ दिवसांच्या आत बंद करा. तोपर्यंत पाण्याच्या वेळेनुसार भारनियमन व्हावे. ज्या वस्त्यांत वसुली जास्त आहे तेथील भारनियमन रद्द करावे. भारनियमन रद्द केल्यास बिले भरणाऱ्या ग्राहकांना बिले भरण्याचे आवाहन केले जाईल, असा इशारा दिला. 
 
भारनियमन बंद करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून निषेध करण्यात आला. त्यानंतर एमआयएमने आपला मोर्चा महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या दालनाकडे वळवला. तेथे कोणीच अधिकारी नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी दालनातील वातानुकूलित यंत्रणेची तोडफोड केली. त्यानंतर मुख्य दरवाजा, टेबल आणि त्यावरील काचा फोडल्या. त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षक महिला अलका किसन शिंदे यांना जबर मारहाण झाली. 
 
नियमित वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना विशेष वाहिन्याद्वारे अखंड वीजपुरवठा
भारनियमनाविरुद्ध वाढत चाललेला संताप पाहून महावितरणनेही नियमितपणे वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांसाठी वेगळा विचार चालवला आहे. प्रामाणिक वीज ग्राहकांच्या कॉलनीत विशेष वाहिन्या टाकून अखंडित वीज देण्याचा आणि जेथे वीज चोरी, गळती अन् थकबाकीचे प्रमाण अधिक आहे असा भाग वेगळा करून तेथे भारनियमन करण्याची योजना तयार करत असल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. या योजनेनुसार शहरात नियमित वीजबिले भरणाऱ्या ग्राहकांचा सर्व्हे करून त्यानुसार वीज वाहिन्यांत बदल केला जाईल, तर जेथे थकबाकी, वीज गळती चोरीचे प्रमाण अधिक तेथे वेगळे क्षेत्र तयार करून भारनियमन केले जाईल. ही योजना लवकरच तयार करून वाहिन्या जोडण्याचे कामही वेगाने होईल. 
 
बातम्या आणखी आहेत...