आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमआयएम'च्या शहराध्यक्षाला चाेपले, खाम नदी पाहणी दौऱ्यावेळी नागरिकांचा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खामनदीच्या पात्राची पाहणी करण्यास गेलेल्या महापालिकेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांसमोर लुडबूड करणारे एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांना नागरिकांनीच चोप दिल्याचा प्रकार गुरुवारी घडला. गुरुवारी सकाळी हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करून महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी मनपाकडे निघाले होते. एकतानगरचे नगरसेवक रूपचंद वाघमारे यांच्या विनंतीवरून सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, नगरसेवक राज वानखेडे, शिवाजी दांडगे, शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी नदीपात्राची पाहणी केली. या वेळी स्थानिक रहिवाशांनी ३०० ऐवजी शंभर फूट नदीचे पात्र अतिक्रमणमुक्त करावे, अशी मागणी केली. त्यावर अधिकारी, पदाधिकारी चर्चा करत होते.
अन् नागरिक संतापले :कादरीयांनी राठोड यांना धक्का देऊन आयुक्तांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. राठोड यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.आम्ही पदाधिकारी बोलतोय, आपण नंतर बोला, नंतर चर्चा करू, असे सांगितले. मात्र, कादरी यांनी मी एमआयएमचा शहराध्यक्ष असून प्रतिनिधीही असल्याचा दावा केला. यावर तुपे यांनी तुम्ही प्रतिनिधी आहात तर मग आम्ही कोण आहोत, असा सवाल केला. यावरून तिघांमध्ये बाचाबाची झाली. मी तुमच्याशी बोलत नसून आयुक्तांशी बोलत आहे, असे कादरी म्हणाले. यावर बकोरिया यांनी कादरींना आपण मला ऑफिसमध्ये येऊन भेटा, असा सल्ला दिला. त्यानंतरही ते ऐकत नसल्याने बकोरियांच्या अंगरक्षकाने त्यांना बाजूला नेऊन शांत राहण्याचे सांगितले. मात्र, कादरी यांनी वानखेडे, वाघमारे, दांडगे यांच्याशी हुज्जत घातली. तुमच्या वॉर्डात आल्यावर नागरिक असे का वागत आहेत, असे तुपे आणि राठोड यांनी वानखेडे, वाघमारे यांना विचारले. त्यावर कादरी या वॉर्डातील नसल्याचे कळले. त्यानंतर नागरिकांनी कादरी यांना बाजूला खेचून चोप दिला.
बातम्या आणखी आहेत...