आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या वाघांपुढे एमआयएमची \"शेर\'वानी; सेनेचे तुपे महापौर, भाजपचे राठोड उपमहापौर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद महापालिकेत युतीचे नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात येतात. त्याला उत्तर देण्यासाठी एमआयएमचे काही नगरसेवक बुधवारी महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी शेरवानी घालून आले होते.

एमअायएमचा ड्रेसकाेड : आमचे सर्व नगरसेवक शेरवानी परिधान करूनच महापालिकेत येतील, अशी घोषणा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीपूर्वी केली होती. त्यानुसार सर्व नगरसेवक शेरवानी घालून एकत्रित बसले होते.

महापौर निवड प्रक्रिया सुरू असताना पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सभागृहात प्रवेश नाकारला होता. त्यामुळे तेथे शेरवानी परिधान करून आलेल्या एमआयएम आणि भगव्या फेट्यात आलेल्या युतीच्या नगरसेवकांचे एकत्रित छायाचित्र मिळणे कठीण होते. मात्र, निवडणुकीचे छायांकन करणाऱ्या सरकारी छायाचित्रकाराकडून ‘दिव्य मराठी’ने हे छायाचित्र मिळवले.
शिवसेनेचे तुपे महापौर, भाजपचे राठोड उपमहापौर
औरंगाबाद शहराच्या २० व्या महापौरपदी शिवसेना - भाजप युतीचे त्र्यंबक तुपे यांची बुधवारी निवड झाली. अपक्ष नगरसेवकांच्या दणदणीत पाठिंब्यासह तब्बल ७१ मते त्यांनी घेतली तर युतीचेच प्रमोद राठोड ७० मते घेत उपमहापौर बनले. या दोन्ही निवडणुकांत एमआयएमचे अनुक्रमे गंगाधर ढगे आणि नसीम सिद्दिकी यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. काँग्रेसचे अफसर खान व भाऊसाहेब जगताप यांना प्रत्येकी १३ मते मिळाली. बहुतांश अपक्षांनी साथ दिल्याने युतीचे दोन्ही उमेदवार सहज विजयी झाले.