आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबक तुपेंचें नाव आघाडीवर, सेनेच्या भगव्या फेट्यांना एमअायएमचे शेरवानीने उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदासाठी आज (बुधवारी) निवडणूक होणार आहे. शिवसेनेकडून त्र्यंबक तुपे यांचे नाव आघाडीवर आहे. युतीमध्ये झालेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला चार वर्षे आणि भाजपला एक वर्ष महापौरपद मिळणार आहे.

दुसरीकडे, एमआयएमचे नगरसेवक शेरवानी परिधान करून मनपा सभागृहात प्रवेश करणार आहेत. आपल्या आवडीनुसार आवडेल त्या रंगाची शेरवानी घालून नगरसेवक पालिकेत येतील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.
आमचे नगरसेवक महापालिकेत शेरवानी घालून जातील व त्यांच्या गळ्यात हिरवे रुमाल असतील, असे आमदार इम्तियाज जलील यांनी आमखास मैदानावरील सभेत जाहीर केले होते. या पक्षाचे ११ पुरुष नगरसेवक निवडून आले आहेत. हे सर्व जण बुधवारी शेरवानीत दिसतील. सर्वांनी काळ्या रंगाचा शेरवानीचा शर्ट, पांढरा चुडीदार परिधान करून यायचे ठरवले होते. मात्र ते शक्य न झाल्याने आवडीनुसार जी शेरवानी उपलब्ध असेल ते परिधान करण्याचा निर्णय झाला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक नेहमीच भगवे फेटे घालून महापालिकेत प्रवेश करतात. एमअायएमने शहरात प्रथमच मुसंडी मारली आहे. त्यामुळे सभागृहात जाताना आपणही वेगळा पेहराव केल्यास त्याकडे सर्वांचे लक्ष लागेल, अशी पक्षाची यामागील भूमिका अाहे.
सर्व शेरवानीतच दिसतील
आमचे सर्व नगरसेवक शेरवानी परिधान करूनच महापालिकेत येतील. आम्ही आधीच जाहीर केल्याप्रमाणे सर्व एकत्र शिस्तीने महापालिकेत बसतील. हा क्षण वेगळा राहील.
इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम
शहराचा २० वा महापौर आज निवडला जाईल. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे आणि एमआयएमचे गंगाधर ढगे यांच्यात थेट लढत होणार असली तरी युतीचे संख्याबळ पाहता त्र्यंबक तुपे यांची महापौरपदी निवड निश्चित आहे. भाजप- शिवसेनेची युती असली तरी सत्तेत सहभागासाठी दोन्ही पक्षांत संख्याबळ वाढवण्यासाठी अपक्ष- बंडखोरांना आपल्याच पक्षात ओढण्याची कसरत सुरू आहे.