आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIM नगरसेवकांची सिक्युरिटीला मारहाण, महापौरांवर खुर्च्यांचा मारा; घडमोडेंनी ऐनवेळचे विषय पाडले मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर मतीन, जफर सुरक्षा रक्षक जाधव यांची बाहेर वाट पाहत होते. त्यांनी काही कार्यकर्त्यांना बोलावूनही घेतले. ‘जाधव को आज छोडेंगे नहीं’ असे ते धमकावत होते. - Divya Marathi
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर मतीन, जफर सुरक्षा रक्षक जाधव यांची बाहेर वाट पाहत होते. त्यांनी काही कार्यकर्त्यांना बोलावूनही घेतले. ‘जाधव को आज छोडेंगे नहीं’ असे ते धमकावत होते.
औरंगाबाद- सर्वांना अंधारात ठेवून मोठ्या वाटाघाटीचे ऐनवेळीचे प्रस्ताव महापौर भगवान घडमोडे यांनी २० जुलैच्या सभेत मंजूर केले. शिवाय गैरव्यवहारामुळे निलंबित झालेल्या चार बड्या अधिकाऱ्यांना कामावर घेतले. त्यावर मनपा सभेत चर्चेची तयारी शिवसेनेचे सदस्य करत असताना १९ ऑगस्टच्या सभेत एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी वंदेमातरम म्हणणार नाही, असे म्हटल्याने गोंधळ उडाला.
 
ऐनवेळच्या प्रस्तावावर चर्चा झालीच नाही. त्यानंतर गेला आठवड्यात पुन्हा घडमोडेंनी मंजूर केलेले काही ऐनवेळचे प्रस्ताव समोर आले. त्यावर सोमवारी (१६ ऑक्टोबर) पुन्हा एमआयएमचे नगरसेवक त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी काहीही कारण नसताना भरसभागृहात सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. महापौरांच्या दिशेने खुर्च्या फेकल्या. त्यावरून झालेल्या गदारोळात ऐनवेळचे विषय मागे पडले. 

घडमोडेंच्या महापौरपदाच्या कारकीर्दीतील ही शेवटची सभा होती. त्यात त्यांनी चाणाक्षपणे राजकारण करत आपला हेतू साध्य करून घेतल्याची चर्चा मनपा वर्तुळात होती. 
 
ते दोन्ही नगरसेवक जनतेच्या हितासाठीच लढत होते 
पाणीटंचाई हा जनतेचा मुद्दा जफर, मतीन मांडत होते. तरीही हाणामारीचे समर्थन होऊच शकत नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणून निलंबनाचा कालावधी कमी करावा. कारण ते जनतेच्या हितासाठी लढत होते. 
- इम्तियाज जलील, एमआयएम आमदार 
 
पाणीटंचाईमुळे रोष, पण खुर्च्या फेकणे योग्य नाही 
पाणीटंचाईमुळे नगरसेवकांवर नागरिकांचा रोष आहे हे खरे आहे. त्यामुळे केवळ एमआयएम नगरसेवक नव्हे तर सर्वच त्रस्त आहे. पण त्यासाठी सुरक्षा रक्षकाला मारहाण करावी, महापौरांवर खुर्च्या फेकाव्यात हे करणे योग्य नाही. 
- भगवान घडमोडे, महापौर. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... नेमकं काय घडलं औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत...
बातम्या आणखी आहेत...