आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णालय हेच मुंडेंचे खरे स्मारक, एमआयएमच्या मागणीला भाजपच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्याचे भूमिपुत्र, भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे शहरात स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावानेच २०० खाटांचे रुग्णालय करावे या एमआयएम पक्षाच्या मागणीची सर्वच क्षेत्रांत जोरदार चर्चा सुरू झाली. "दिव्य मराठी'ने या संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले असता भाजपकडून एमआयएमच्या मागणीला पाठिंबा मिळाला.
घाटीवरील ताण कमी करण्यासाठी नवे रुग्णालय असावे, असा त्यांचा सूर होता. गेल्या वर्षी जूनला मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. त्यांचे स्मरण म्हणून मोठे अपघात रुग्णालय असावे, अशी मागणी शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी पुढे रेटली. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तर स्मारकाचा लोकांना कितपत उपयोग, असे म्हणत मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर येथेही स्व. मुंडे यांच्या नावाने रुग्णालय उभारावे, असे म्हटले. मुंडेंच्या स्मारकाच्या निमित्ताने एक लोकोपयोगी सुविधा शहरात व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी अर्थातच राजकीय पाठबळ, इच्छाशक्ती गरजेची असल्याने ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने विविध राजकीय पक्षांची मते जाणून घेतली. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, २००७ मध्ये महापौर असताना डॉ. भागवत कराड यांनी मध्यवर्ती जकात नाक्याजवळ ५० खाटांचे रुग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. ती प्रत्यक्षात आली नाही. आता त्याच जागेवर ५०० खाटांचे रुग्णालय उभारून डॉ. कराड यांनी मुंडेंना श्रद्धांजली अर्पण करावी. रुग्णालयासाठी मी आमदार निधी देण्यासही तयार अाहे. भाकपचे राज्य महासचिव डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, स्मारक लोकोपयोगी असावे. ते रुग्णालय असेल तर गरिबांचा फायदाच होईल.
रुग्णालय खाटांची संख्या
घाटी ११७५
एमजीएम ७००
हेडगेवार २६७
धूत २००
बजाज २२५
चिकलठाण्यात २०० खाटांचे रुग्णालय अंतिम टप्प्यात.पाच वर्षांत ३०० खाटांच्या रुग्णालयाची गरज. नव्याचा निर्णय झाल्यास ४५ कोटी लागून २०१८ मध्ये उभे राहू शकते.
जिल्हा रुग्णालय
चिकलठाण्यात इमारतीचे काम होत आहे. २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ३८ कोटी मंजूर झाले. २९ कोटी मिळाले. २०१० पासून काम सुरू होते. उर्वरित कोटी मिळताच ते महिन्यांत रुग्णसेवा सुरू होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एन. गायकवाड म्हणाले.
दरमहा १५ अपघात
घाटीमध्ये मे २०१४ ते २०१५ दरम्यान अपघातातील १८५ जण दाखल झाले. दरमहा किमान १५ अपघात घडतात.

- रुग्णालय उभारणीचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जातो.
- सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत उपलब्ध जागांची पाहणी होते.
- निश्चित केलेल्या जागेवर इमारतीचा आराखडा, अंदाजित रकमेचा प्रस्ताव बांधकाम विभाग तयार करतो.
- आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने प्रस्तावाला मान्यता दिल्यावर निधी मंजूर होतो.
- बांधकाम विभागाकडून निविदा निघतात.
- दरम्यान, आरोग्य विभागाकडून डॉक्टर, कर्मचारी वर्ग भरतीची प्रक्रिया होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दिग्गज नेत्यांच्या प्रतिक्रिया...