आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एमआयएम'मध्ये बदलाचे "वादळ', अनेक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; "एमआयएम'च्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात पक्षाध्यक्षांकडे अनेक तक्रारी गेल्या आहेत. तसेच पक्षाची ताकद वाढावी यासाठी पक्षात बदलाचे वारे नव्हे, तर वादळच उठणार असून अनेक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत या पक्षातील सूत्रांनी दिले आहेत.
खांदेपालटामध्ये मुख्य पदांवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. बिहारच्या निकालानंतर हे बदल होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
एमआयएमची ताकद वाढावी यासाठी पक्षात मोठे फेरबदल करून गाव तेथे शाखा स्थापण्याचा संकल्प एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. राज्यात काही ठिकाणी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. एमआयएमचे राज्यात दोन आमदार असून नांदेड, औरंगाबाद
महानगरपालिकेतही पक्षाने चांगली कामगिरी केल्यामुळे पक्षाला या दोन शहरांत ताकद वाढवायची आहे. त्यासाठी पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी देण्यात येणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन अली यांनी काही दिवसांपूर्वी भोकर नगर परिषदेत एमआयएमचे उमेदवार दिले नसल्याची तक्रार तेथील एमआयएमच्या काही कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच अली यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, असा आरोप झाला होता. त्या वेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी अली यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले होते. तसेच पुतळ्याला चपलाचे हार घातले होते. या सर्व प्रकाराची ओवेसी यांनी दखल घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कार्यकारिणीकडून अपेक्षाभंग
सध्याच्याकार्यकारिणीकडून पक्षश्रेष्ठींना अपेक्षित कामकाज होत नाही. पक्षाचे प्रत्येक ठिकाणी कार्यालय तसेच नागरिकांच्या समस्या ऐकणे, त्याचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क करणे, शासकीय योजनांचा गरजूंना फायदा करून देण्याची कामे होत नाहीत. त्या दृष्टिकोनातून पक्षाने पावले उचलण्याचा संकल्प केला आहे.

बिहारच्या निकालानंतर बदल
बिहारमध्येसहा ठिकाणी एमआयएमचे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचे अध्यक्ष ओवेसी हे महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विशेष लक्ष देणार आहेत. त्यामुळे राज्य पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत मोठ्या प्रमाणात उचलबांगडी आणि खांदेपालट होणार आहे.

तरुणांना मिळणार संधी
दलित-मुस्लिमतरुणांना कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणात संधी देण्यात येणार आहे. तरुणांमध्ये आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांचे आकर्षण आहे. पक्षाने त्या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखली आहे.