आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये एमआयएमच्या गटांत तुंबळ हाणामारी, पाच गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संजयनगर बायजीपुर्‍यात एमआयएम नेते डॉ.गफ्फार कादरी व बंडखोर नेते अमजद चाचू यांच्या गटांत गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. त्यात अमजद चाचूसह चौघे जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर आहे. संजयनगर बायजीपुरा वॉर्ड क्रमांक ५७ मधील एमआयएम उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही गट भिडले. या घटनेनंतर जिन्सी परिसरात तणाव निर्माण झाला असून कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे.

संजयनगरात एमआयएमच्या उमेदवार समिना शेख यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी डॉ. कादरी आले होते. वॉर्डातून एमआयएमचे बंडखोर नेते अमजद चाचू यांची भावजय तमेजा खान अपक्ष लढत आहेत. अमजद चाचू यांच्या भावजयीला पक्षाचे तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते.

घटनेनंतर एमआयएमकडून शेख अहेमद शेख इलियास, तर बंडखोर गटाकडून अमजद खान यांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. उशिरापर्यंत अटक झाली नसली तरी दोन्ही गटांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आधी बाचाबाची, मग हाणामारी
सभेनंतर कादरी व अमजद चाचू यांच्या गटात आधी शाब्दिक बाचाबाची व नंतर हाणामारी झाली. यात डॉ. कादरींना किरकोळ मार लागला. डोक्यात रॉड मारल्याने अमजद चाचू गंभीर जखमी झाले. मारामुळे शकीलबाबा बेशुद्ध असून प्रकृती चिंताजनक आहे. मतीन पटेल यांच्याही डोक्याला दुखापत झाली. या धुमश्चक्रीत डॉ. कादरी व इतर कार्यकर्त्यांच्या तीन वाहनांच्या काचा फुटल्या.