आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी MIM चे जहांगीर खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तब्बल एक महिना दिवसांनंतर अखेर मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटला. महापौरांनी एमआयएमचे जहांगीर खान यांना विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र दिले आणि गतिरोध दूर झाला.

काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी निकालानंतर विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला द्यावे, अशी मागणी करताना एमआयएमची राज्यात नोंदणी नसल्याने नोंदणी असलेल्या काँग्रेसला संधी मिळावी, असा दावा केला होता. दुसरीकडे एमआयएमनेही सर्वाधिक नगरसेवक आपलेच असल्याने आपल्यालाच हे पद मिळावे, अशी मागणी केली होती.

विरोधी पक्षनेता निवडणे हा महापौरांचा अधिकार असल्याने दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर चांगलाच दबाव होता. त्यांनी आधी निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला. आयोगाने हा चेंडू नगरविकास खात्याकडे ढकलला. त्यांनी तो परत महापौरांकडे पाठवला. मग महापौरांनी ज्येष्ठ विधिज्ञ अतुल कराड यांना सल्ला मागितला. या पत्रापत्रीत बराच काळ गेला. दरम्यानच्या काळात दोन्ही बाजूंचे नगरसेवक महापौरांना सतत येऊन भेटत होते. आज अखेर महापौर त्र्यंबक तुपे यांनी एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय घेत अधिकृतरीत्या पत्रही दिले. त्यानुसार आता एमआयएमचे जहांगीर खान उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेपासून विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यभार स्वीकारतील.
कोर्टात जाणार
दरम्यान, महापौरांनी एमआयएमला संधी देण्याच्या विरोधात काँग्रेस न्यायालयात जाण्याचा विचार करीत असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
सेनेने केली सोयीची निवड
एमआयएम हा शिवसेनेसाठी अतिशय सोयीचा मुद्दा असून एमआयएमचा बागुलबुवा दाखवून शहरातील राजकारण फिरवण्याचा प्रकार मनपा निवडणुकीतही घडला होता. त्यामुळे एमआयएमचा विरोधी पक्षनेता होणे शिवसेनेसाठी फायद्याचे अाहे, असे मानले जाते.
बातम्या आणखी आहेत...