आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमचे शहराध्यक्ष जिंकले, जिल्हाध्यक्ष हरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएमची पाळेमुळे शहरात रोवणारे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांचा विश्वासनगर, हर्षनगर वॉर्डातून काँग्रेस उमेदवाराकडून दारुण पराभव झाला. मात्र तर शहराध्यक्ष सय्यद मतीन हे जयभीमनगर, आसेफिया कॉलनी येथून विजयी झाले आहेत. कुरेशी यांच्या पराभवाने पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी या पक्षातीलच एक गट त्यांच्या पराभवाने आनंदी झाला आहे.
जावेद कुरेशी यांनी आरेफ कॉलनी -प्रगती कॉलनी वॉर्ड क्रमांक १९ मधून उमेदवारी घेतली होती. परंतु येथे आपला पराभव होईल या भीतीने त्यांनी रात्रीतून पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करीत वॉर्ड बदलला होता. कुरेशी यांनी त्यानंतर वॉर्ड क्रमांक ११ विश्वासनगर, हर्षनगर येथून उमेदवारी घेतली. या वॉर्डातून अय्यूब खान यांची उमेदवारी पक्की झाली. होती परंतु कुरेशींच्या दबावतंत्रामुळे उमेदवारी बदलली गेली. त्यामुळे अय्युब खान यांनीही रात्रीतून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आणि कामाला लागले.
कुरेशी यांच्या प्रचार कार्यालयाच्या वेळी असदुद्दीन ओवेसी आले. त्यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते फेरोज खान यांना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. कुरेशी यांनी भर सभेत पवित्र कुराण शरीफ हातात घेऊन तिकीट वाटपात आर्थिक गैरव्यवहार झाला नाही, असा स्टंट केला होता. या सर्व प्रकारामुळे कुरेशी यांच्या बद्दल मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला होता. त्याचाच फटका त्यांना बसला.
निवडून येण्याआधीच ही मंडळी दादागिरी करत असेल तर त्यांना दूर ठेवा. त्यांच्यापेक्षा काँग्रेसचे अय्यूब खान हे स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांनाच निवडणूक देण्याचे मतदारांनी ठरवले. कुरेशी यांना हजार ६२७ मते मिळाली तर खान यांना हजार ८५० मते मिळाली.
एमआयएमचे शहराध्यक्ष सय्यद मतीन हे वॉर्ड क्रमांक २० जयभीम नगर, आसेफिया कॉलनी वॉर्डातून निवडून आले. त्यांनी बसपा उमदेवाराचा पराभव केला. कांग्रेसचा उमदेवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला.