आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम कार्यकर्त्यांना औरंगाबादेत मारहाण; सिटीचौक परिसरात तणाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पानदरिबा परिसरात एमआयएमच्या दोन कार्यकर्त्यांना बुधवारी रात्री मारहाण झाल्यानंतर सिटी चौक पोलिस ठाण्याजवळ मोठा जमाव जमल्याने तणावाची परिस्थिती होती. बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास अखिल चिश्ती आणि आमेर खान आरेफ खान हे युवक करिझ्मा दुचाकीवरून पानदरिबा परिसरातून जात होते. त्या वेळी शब्बर दवासाजसमोर एका दुचाकीस्वार महिलेस अज्ञात वाहनधारकांनी धडक दिल्याने ती पडली. त्या महिलेच्या मदतीला हे दोन्ही युवक गेले. मात्र त्यांच्या करिझ्मा दुचाकीवर ‘जॉइन एमआयएम’ लिहिले असल्याने परिसरातील काही लोकांनी त्यांना मारहाण केली व ते पळून गेले. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी ते दोघे युवक सिटी चौकात गेले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच 150 ते 200 जणांचा जमाव सिटी चौक पोलिस ठाण्याच्या परिसरात जमल्याने या भागातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद केली. रात्री उशिरापर्यंत सिटी चौक पोलिस ठाण्यात कोणाविरुद्धही गुन्हा दाखल क रण्यात आला नव्हता. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.