आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमच्या याद्या मुंबईत अडकल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयएमच्या औरंगाबाद महापालिका उमेदवारांच्या याद्या मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी तपासल्या. मात्र, सात वॉर्डांत उमेदवारीवरून घोळ झाल्यामुळे या याद्या मुंबईतच अडकल्या. उमेदवार निश्चितीवरून नेत्यांची अडचण झाली असून पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी वाढण्याची शक्यता आहे.

एमआयएम ६० वाॅर्डांत आपले उमेदवार देणार आहेत. मात्र, शरीफ कॉलनी, रोजाबाग-भारतमातानगर, गणेशनगर, किराडपुरा, लोटाकारंजा, संजयनगर, जिन्सी या सातही वॉर्डांत मातब्बर उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते. ती रोखण्यासाठी विचारपूर्वक उमेदवारी देण्याचा पक्षाचा विचार आहे. पक्षाचे नेते वांद्रे येथील िवधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. त्या वेळी गुुरुवारी उमेदवारांच्या नावांवरून चर्चा करण्यात आली. पक्षाच्या अध्यक्षांनी उमेदवारांच्या बाबतीत आमदार जलील यांना विचारणा केली आणि कुणाला उमेदवारी दिली तर त्याची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, याचा सर्व अंदाज घेतला.

दिलेला उमेदवार निवडून आलाच पाहिजे. यासाठी पक्षाकडून त्याला मदत झाली पाहिजे, अशाही सूचना करण्यात आल्या. मुस्लिमबहुल वॉर्डात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने सर्वांचेच समाधान करता येणार नाही; परंतु बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवार निवडताना चूक होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या. दरम्यान, लवकरच यादी जाहीर होणार असल्याचे आ. जलील यांनी सांगितले.