आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाच्या दिवशीच आ. इम्तीयाज यांना शिवीगाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाढदिवसाच्या दिवशी एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांना शिवीगाळ झाल्याचा प्रकार सोमवारी दौलताबाद येथील गेस्टहाऊसमध्ये घडला आहे. जलील यांना शिवीगाळ करणाऱ्यांच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी गणेश कॉलनी भागात रहाणाऱ्या यासेर नावाच्या कार्य र्त्यांनी जलील यांच्या वाढदिवसानिमित्त दौलताबाद येथील गेस्ट हॉऊसयेथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एमआयएमचे नगरसेवक पदाधिकारी महीला नगरसेवकांचे पती यांना देखील निमंत्रीत करण्यात आले होते. वातावरण उत्साहात आणि जल्लोषात असतांना जलील हे केक कापण्यासाठी उठले . त्यावेळी मनपा निवडणूकीच्या वेळी नगरसेवक टिकीट वाटपावरुन नाराज असलेले रोहीला गल्लीतील मेहराज खान आणि रिझवान खान यांनी इम्तीयाज जलील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्या आमदाराला शिव्या देत असल्साचे पाहून जलील समथर्कांनी देखील शिवीगाळ करीत रिझवान आणि मेहराज यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत या दोघांना एका खोलीत कोंडले. आणि वाद निवळला. या दोघांच्या विरोधात शेख अलीम शेख यांच्या फिर्यादीवरुन अगदखलपात्र गुन्हा दौलताबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या बाबत इम्तीयाज जलील यांना विचारले असतर ते म्हणाले हा जीवनाचा एक भाग आहे. काही लोक माझ्यावर नाराज असतील ही त्यांची वैयक्तीक बाब आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी काहीही व्देष नाही.