आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसीप्रकरणी गृहसचिव,डीजीपी, आयुक्तांना नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायमूर्ती एस. बी. देशमुख व एम. टी. जोशी यांनी राज्याचे गृहसचिव, पोलिस महासंचालक व शहराचे पोलिस आयुक्त यांना नोटीस बजावली आहे. सरकारच्या वतीने सरकारी वकील सुनील कुरुंदकर यांनी नोटीस स्वीकारली.

ओवेसींविरुद्ध 144 कलम लावून त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही बंदी बेकायदा असल्याचे ओवेसींनी याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्ता बॅरिस्टर असून, तो लोकप्रतिनिधी आहे. तसेच पोलिस आयुक्तांनी 144 कलम पारित करताना ठोस पुरावे दिले नाहीत. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा. याच याचिकेत ओवेसी यांनी खुलताबादच्या दग्र्यास भेट द्यायची असल्याने परवानगी द्यावी, असा अर्ज केला आहे. दग्र्यास भेट देण्यासंबंधी 11 व प्रवेश नाकारल्याप्रकरणी 20 रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने अँड. एस. एस. काझी यांनी बाजू मांडली.