आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MIM Party Established New Samiti For Santar Jal Jwahini

‘समांतर’साठी एमआयएमची समांतर चौकशी समिती- इम्तियाज जलील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनीचा प्रकल्प योग्य की अयोग्य, याची तपासणी करण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्या आदेशावरून समिती गठित करण्यात आली. मात्र त्यात समांतरच्या कर्त्याधर्त्यांचा समावेश असल्याने निष्पक्ष अहवाल येऊच शकत नाही, अशी टीका करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी वेगळी समिती गठित करण्यात आल्याची घोषणा केली. यात मान्यवर तज्ज्ञांचा समावेश असून आणखी काही जण यात सहभागी होऊ शकतात तसेच आपली मते नोंदवू शकतात, असे पत्रकार परिषदेत सांगितले.

हा प्रकल्प योग्य असल्याचे या समितीने सांगितले तर तो लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र अयोग्य सांगितल्यानंतर तो बंद करण्यासाठीही प्रयत्न होतील. यासाठी रस्त्यावर उतरून कार्यकर्ते ठेकेदाराला शहरात फिरू देणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. किमान माझ्या मतदारसंघात या ठेकेदाराच्या एकाही कर्मचाऱ्याला मी फिरू देणार नाही, जनतेच्या हितासाठी मला हे पाऊल उचलावे लागेल, असेही ते म्हणाले. समितीची प्राथमिक बैठक बुधवारी दुपारी सुभेदारी विश्रामगृहावर झाली.

सर्वप्रयोगांसाठी औरंगाबादच का? : विजेचेखासगीकरण असो की बीओटी पीपीपी प्रकल्पासाठी औरंगाबादेचीच का निवड केली जाते, असा सवाल त्यांनी केला. बारामती किंवा पिंपरी-चिंचवड या शहरांची का निवड केली जात नाही, असे सांगतानाच समांतर प्रकल्पात सत्ताधारी शिवसेना नेत्यांचा हात असल्याचा आरोप होतो, परंतु पुरावे असल्याशिवाय आपण कोणाचे नाव घेणार नाही, असेही ते म्हणाले.

समिती कशासाठी?
पालिकेच्यावतीने गठित होणाऱ्या समितीत खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह पालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते आधीपासून या प्रकल्पाशी संबंधित आहेत. त्यामुळे ही मंडळी सोयीचाच अहवाल देतील. म्हणून ही समिती गठित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले.

असे आहेत समिती सदस्य
निवृत्तसनदी अधिकारी कृष्णकांत भोगे, पालिकेचे निवृत्त पाणीपुरवठा अधिकारी कलीम अख्तर, प्रा. विजय दिवाण, वाल्मीचे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांचा या समितीत समावेश आहे. याशिवाय ज्या कोणाला या प्रकल्पाविषयी माहिती आहे, असे यात सहभागी होऊ शकतात.