आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमची जातीयवादी प्रवृत्ती , एम. एम. शेख यांचे रोखठोक मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेसच्या प्रदेश अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी माजी आमदार एम. एम. शेख यांची तिसऱ्यांदा निवड झाली. यानिमित्त त्यांनी "दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक उत्तरे दिली. त्यांनी साधलेला मनमोकळा संवाद...

प्रश्न: अल्पसंख्याकांसाठीकोणते काम केले?
-:मुस्लिमसमाजाच्याविद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी २००९ मध्ये आघाडी सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील शिक्षणमंत्री होते. आमच्या मागणीनुसार त्यांनी ४५० उर्दू शाळांना मान्यता दिली. अल्पसंख्याक विभागासाठी २०० कोटी रुपयांचानिधी असताना ५०० कोटी रुपयेनिधी मिळवून घेतला होता. मौलाना आझाद आर्थिक िवकास महामंडळाला कोटी रुपयांचानिधी मिळत होता तो ५०० कोटी रुपये करून घेतला. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

प्रश्न: औरंगाबादशहरात कोणते महत्त्वाचे काम आपण केले?
-:दरवर्षीहजारो मुस्लिम बांधव पवित्र हज यात्रेला जातात. मराठवाड्यातील भाविकांना दोन-तीन दिवसांपूर्वीच शहरात दाखल व्हावे लागते. त्यांच्या राहण्याची सोय पूर्वी नव्हती, त्यामुळे आम्ही हज हाऊसचे काम मार्गी लावले. किलेअर्कमध्ये हज हाऊस लवकरच बांधण्यात येणार आहे. त्यामुळे नेहमी होणारी भाविकांची गैरसोय आता होणार नाही.

प्रश्न: मतांसाठीघाईगडबडीत मुस्लिमांना आरक्षण देण्यात आले होते, हेे कितपत योग्य आहे?
-:मुस्लिमांनामुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्वनिर्णय आघाडी सरकारने घेतला होता. चार टक्के आरक्षणमिळणार होते, परंतु आम्ही एक टक्का वाढवून घेतला ते पाच टक्के करून घेतले. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केले होते. काँग्रेसचे मन स्वच्छ होते त्यामुळे आरक्षण देण्यात आले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिक बोलणार नाही.

प्रश्न: तुमचेसरकार नसल्यामुळे अलिगड मुस्लिमविद्यापीठाच्या उपकेंद्राचा निर्णय रद्द झाला का?
-:.आमचे सरकार असताना अलिगढ मुस्लिमविद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रस्ताव तयार झाला होता. आमचे सरकार नसते, तर ते झाले नसते; परंतु केंद्रातील मोदी सरकारने तो प्रस्तावच रद्द करून टाकल्यामुळे येथे उपकेंद्र होणार नाही. आमचे सरकार असते, तर ते पूर्ण झाले असते.

प्रश्न: केंद्र,राज्यातील सरकार सक्षम आहे का?
-:केंद्रातराज्यात जनतेला जी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आला, ती आश्वासने त्यांनी पूर्ण करावीत. काळा पैसा अजून आलेला नाही. आमची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या कापसाला साडेपाच हजार रुपये भावमिळत होता. आता चार हजार रुपयेमिळतोय. उसाचा पहिला हप्ता एकवीसशे रुपयेमिळत होता, आता पंधराशे रुपयेमिळत आहे.
प्रश्न: एमआयएममुळेकाँग्रेसला धक्का पोहोचेल असे वाटते का?
-:काँग्रेसधर्मनिरपेक्ष पक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. मुस्लिम समाज हा धर्मनिरपेक्ष पक्षासोबतच असतो. एमआयएमची विचारधारा जातीयवादी आहे. एमआयएम जर एवढा चांगला पक्ष होता, तर आंध्रामध्ये का वाढला नाही? एमआयएमचे दोन आमदार काय कल्याण करणार आहेत, हेही लवकरच दिसून येईल.