आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्ता बघूनच एमआयएम नवीन चेहऱ्यांना संधी देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "एमआयएम'मध्ये प्रवेश करण्यासाठी मुस्लिम असण्याची अट नसून सर्व जाती-धर्मांतील लोकांचा हा पक्ष आहे, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत तिकीट देताना उमेदवारांची गुणवत्ता बघूनच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. यामुळे जे दलबदलू नेते "एमआयएम'च्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
"एमआयएम'च्या लाटेत आपलेही फावणार, असे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना वाटत असून बरेच जण "एमआयएम' नेत्यांच्या संपर्कात आहेत. "एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील तसेच इतरही नेत्यांशी ते जवळीक निर्माण करू पाहत आहेत. काही नेत्यांची आमदारांच्या निवासस्थानी ऊठबस वाढली आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या ितकिटावर निवडणूक लढवली तर आपला पराभव होईल, या भीतीने बरीच मंडळी निवडणूक लढायची की नाही, अशा िद्वधा मन:स्थितीत आहे, तर एमआयएमचे तिकीट मिळवून निवडणूक लढली तर आपला फायदा होईल, या आशेने बरेच जण एमआयएमच्या ितकिटासाठी आतापासूनच फील्डिंग लावत आहेत.

स्वच्छ चारित्र्याचे लोक हवेत : "एमआयएम' स्वच्छ चारित्र्याच्या, सुशिक्षित आणि काम करणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. "एमआयएम'च्या या भूमिकेमुळे इतर पक्षांतील आयारामांना त्याचा फटका बसू शकतो. तेच ते चेहरे कधी पक्ष बदलून, तर कधी अपक्ष निवडून येतात; परंतु कोणतेही काम ते करत नाहीत, अशा लोकांना "एमआयएम' थारा देणार नाही, असेही पक्ष सूत्रांनी स्पष्ट केले.
डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, वकिलांना संधी
"एमआयएम'मध्ये डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, वकील, पत्रकार अशा मंडळींना स्थान देणार आहे. अशी सुशिक्षित मंडळी महापालिकेत गेली, तर त्यांच्या हातून वॉर्डात चांगली कामे होतील, या सर्व गोष्टींचा विचारही पक्षाने केला आहे. आज पक्षात किती लोक येतात याला महत्त्व नाही, तर किती चांगले लोक आहेत याला महत्त्व असून या एकाच निकषावर महापालिका निवडणुकीच्या तिकिटांचे वाटप होईल, असेही पक्षातील नेत्यांनी सांिगतले.