आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमआयएम’चा ‘इसिस’विरोधात सोशल एल्गार! भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सोशलमीडियाच्या माध्यमातून देशातील तरुणांचे “ब्रेन बॉश’ करून त्यांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या “इसिस’ या दहशतवादी संघटनेविरुद्ध ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूलने (एमआयएम) सोशल मीडियाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. “इसिस’च्या भूलथापांना मुस्लिम तरुणांनी बळी पडू नये यासाठी जनजागृती केली जात आहे. “इसिस’ इस्लाम नव्हे दहशतवाद आहे, दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवादाविरुद्ध एकजूट व्हा, इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नाही, अशा पोस्ट साेशल मीडियावर टाकल्या जात आहेत.

इसिसच्या भूलथापांना मुस्लिम तरुणांनी बळी पडू नये यासाठी आमदार इम्तियाज जलील यांनी पुढाकार घेतला आहे. “एमआयएम’ नेत्यांच्या भाषणांनी मुस्लिम तरुणांच्या भावना भडकवल्या जात असल्याचा आरोप काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील मंडळीकडून होत आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदोद्दीन ओवेसी, आमदार इम्तियाज जलील, आमदार वारीस पठाण यांच्यासह पक्षाने इसिसला पूर्वीच जाहीरपणे विरोध केला आहे. नुकतीच परभणीतून दोन संशयित तरुणांना एटीएसने अटक केल्यानंतर मराठवाड्यातही “इसिस’ची पाळेमुळे रोवल्याचे स्पष्ट झाले.

मुस्लिमसंघटनांकडून जनजागृती : इसिस’सोशल मीडियावर पोस्ट टाकून मुस्लिम तरुणांना जाळ्यात ओढत आहे. या संघटनेपासून सावध राहण्यासाठी मुस्लिम समाजात वेगवेगळ्या संघटनाव्दारे जनजागृती केली जात आहे. मुस्लिम समाजातील अभ्यासकांनी पूर्वीपासूनच दशहतवादाला मुस्लिम धर्मात थारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही मुस्लिम तरुण या वाटेवर जाऊ लागल्याने आता जमाअत-ए-इस्लामी हिंद, इमाम संघटना, जमैतूल उलैमा हिंद, ऑल इंडिया जमैतुल हदीस, दारूल उलूम देवबंद, तामिरे मिल्लत, इस्लामिक रिसर्च सेंटर, रजा अकादमी आदी मुस्लिम संघटनांनी समाजात जनजागृतीला सुरुवात केली आहे. त्यातच राजकीय पक्ष एमआयएमनेही दहशतवादाच्या विरोधात धुरा खांद्यावर घेतली आहे.

मीडियाचा वापर
‘इसिस’च्याभूलथापांना मुस्लिम तरुणांनी बळी पडू नये यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहोत. या माध्यमातून मुस्लिम तरुणांमध्ये जनजागृती करत आहाेत. इम्तियाजजलील, आमदार.
बातम्या आणखी आहेत...