आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम भरवणार आता जनता दरबार, हैदराबादच्या धर्तीवर शहरात प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) हैदराबादच्या धर्तीवर शहरात लवकरच जनता दरबार भरवणार आहे. बिहारच्या निवडणूक निकालानंतर नियमित जनता दरबार भरवण्यात येईल. यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार इम्तियाज जलील पुढाकार घेणार असून सध्या पक्षाकडून मोठ्या जागेची चाचपणी सुरू आहे.
हैदराबाद येथे एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल वहाब ओवेसी यांच्या काळापासून जनता दरबार भरवण्यात येतो. तीच परंपरा कायम राखत खासदार सुलतान ओवेसी हे जनता दरबार भरवत असत. त्यानंतर खासदार असदोद्दीन ओवेसी, आमदार अकबरोद्दीन ओवेसी हे दररोज जनता दरबार भरवतात.
या वेळी पक्षाचे नगरसेवक, आमदार उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकतात. सर्व समाजाच्या नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात येते. अनेक समस्यांचा तत्काळ निपटारा लागत असल्याने हैदराबाद शहरात एमआयएमविषयी नागरिकांमध्ये चांगला संदेश गेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेतही जनता दरबार सुरू करू, असे जाहीर केले होते.

पक्षाला यश मिळाल्यानंतर शहरातील एकमेव आमदार इम्तियाज जलील यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. येणाऱ्या प्रत्येकालाच वेळ देणे शक्य होत नसल्याने त्यांच्या कामाचा ताण वाढला असल्याचे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आमदारांना पक्ष संघटन वाढवणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यातील दौरे करावे लागतात. यामुळे आमदार भेटत नाहीत, संपर्क कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्या जवळचे लोक आम्हाला आमदारांसोबत बोलू देत नाही, अशी नागरिकांची नाराजी होती. या सर्व गोष्टींचा विचार करून एमआयएमच्या वतीने जनता दरबाराची तयारी करण्यात येत आहे.

पुढे वाचा.. जागेची चाचपणी सुरू