आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: भविष्यात औरंगाबादवर MIM चा परछम, युती जाईल विरोधी बाकांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत तब्बल 25 जागा जिंकून बहुचर्चित एमआयएम पक्षाने शहरातील आपला करिश्मा कायम राखला आहे. विधानसभा निवडणुकीत एका आमदार निवडून आल्यावर आता एमआयएम पुन्हा सत्तेत दिसणार नाही, अशा वल्गना करण्यात येत होत्या. पण आमदार केवळ एक झांकी होता आणि आता संपूर्ण पिश्चर बाकी आहे, असे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे एमआयएमने सोशल इंजिनिअरिंगचा 'बहेनजी' मायावतींचा फंडा पुरेपुर अवलंबल्याने यश मिळाल्याचे दिसून येते. उत्तर प्रदेश पादाक्रांत करण्यासाठी मायावतींनी दलित आणि ब्राम्हण वर्गाला एका मंचावर आणले होते. एमआयएमने त्यात जरा बदल करीत मुस्लिम आणि दलितांना एका मंचावर आणले आहे. यामुळेच औरंगाबाद शहरात या पक्षाला तब्बल 25 जागा जिंकता आल्या. यातील पाच जागांवर दलित उमेदवार निवडून आले आहेत.
जर एमआयएमने सोशल इंजिनिअरिंग केले नसते तर हा पक्ष केवळ 10 ते 15 जागांवर एकवटला असता. आता भविष्यातही याच फॉर्म्युल्याने निवडणूका लढविल्या जाणार असल्याचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी सांगितले आहे. पुढील निवडणुकांमध्ये हिंदू बहुल भागात उमेदवार दिले जातील. हिंदूंना संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. असे झाले तर तो सोशल इंजिनिअरिंगचा पुरेपुर वापर असेल. त्याच्या बळावर औरंगाबादची सत्ता केंद्रे एमआयएमला सहज हाती घेता येतील.
औरंगाबादचा विचार केला तर या शहरात तीन प्रमुख शक्ती आहेत. हिंदू, मुस्लिम आणि दलित. यापैकी दोन शक्ती जेव्हा एकवटतात तेव्हा त्याच्या गळ्यात विजयी माळा पडते. यापूर्वी दलित वर्ग विखुरलेला होता. त्यामुळे केवळ हिंदू आणि मुस्लिम व्होट बॅंकेवर उमेदवार निवडून यायचे. दलित वर्गाला एक करण्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीही अपयशी ठरले होते. पण एमआयएमने पहिल्याच निवडणुकीत ही चुक सुधारली. मुस्लिम आणि दलितांना एकत्र आणले. याचा परिणती तब्बल 25 जागा जिंकण्यात झाली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, कसा येऊ शकतो औरंगाबादवर एमआयएमचा अंमल... शिवसेना-भाजप कशी जाईल विरोधी बाकांवर...