आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राखी आणण्यासाठी निघालेली चिमुरडी कारच्या धडकेने ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुरुवारचा रक्षाबंधनाचा सण आठ वर्षांच्या चिमुरडीला साजरा करता नाही आला. आपल्या तीन वर्षांच्या लहान भावाकरिता राखी खरेदीसाठी ती काका-काकू आजी-आजोबांसोबत मंडईत गेली; पण त्याआधीच काळाने तिच्यावर झडप घालून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच लाडक्या भावापासून तिला हिरावून नेले. भरधाव कारच्या धडकेने ही चिमुरडी जागीच ठार झाली. अनुष्का भगवान दाभाडे असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
अनुष्का (८, रा. शहानगर, चिकलठाणा) बुधवारी दुपारी च्या सुमारास आजी, आजोबा काका-काकूसोबत आपल्या तीन वर्षांचा लहान भाऊ आशिषला राखी आणण्यासाठी आंबेडकर चौकातील मंडईत गेली होती. दरम्यान वडीलधारे राख्या खरेदी करत असताना ती रस्त्याच्या बाजूला उभी होती. याच वेळी मंडईतून वेगात आलेल्या कारने तिला धडक दिली. त्यामुळे ती जागीच कोसळली. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी अनुष्काची तब्येत गंभीर असल्याने घाटीत दाखल करण्यास सांगितले. घाटीत नेल्यानंतर दुपारी ४.३० वाजता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अनुष्काला रुग्णालयात नेण्याच्या धावपळीत कार चालक फरार झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .

पहिलीची विद्यार्थिनी
अनुष्का चिकलठाणा एमआयडीसीतील स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये पहिलीच्या वर्गात शिकत होती. बुधवारी पतेतीनिमित्त सुटी असल्याने दुपारीच ती राखी आणण्यासाठी गेली होती.
बातम्या आणखी आहेत...