आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर वयात आणण्यासाठी बालिकेला पाजत होते दारू, सिगारेटचे चटके आणि रुळाचे फटके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या हडको एन-९ येथील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यात तीन वर्षांच्या मुलीचा क्रूर पद्धतीने छळ करणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. या महिला गेल्या पाच दिवसांपासून त्या चिमुकलीला दारू, बिअर पाजून तिच्या शरीरातील खासगी भागांना सिगारेटचे चटके देत होत्या. रडू लागताच तिला रुळाने बेदम मारहाणही करत होत्या, अशी माहिती मंगळवारी उघडकीस आली आहे. वेश्या व्यवसायाकडे वळू पाहणाऱ्या एका तरुणीने त्या चिमुकलीच्या छळाची माहिती दिल्यावर महिला बाल कल्याण समिती आणि पोलिसांच्या कारवाईची चक्रे फिरली. मानवी संस्कृतीने शरमेने मान खाली घालावी, असे घृणास्पद कृत्य करणाऱ्या गीता कृष्णा कदम, अनिता बाबासाहेब रोपेकर यांची चौदा दिवसांसाठी हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली असून त्यांच्या पाच साथीदारांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १९ वर्षीय तरुणीला वेश्या व्यवसायासाठी संशयित आरोपी गीता आणि अनिता (वय ३०, रा. रेणुकामाता मंदिरामागे, एन-९, सिडको) प्रवृत्त करत होत्या. गिताने दोन-तीनवेळा तिला स्वत:च्या घरी बोलावले होते. दोन दिवसांपूर्वी ही तरुणी तेथे गेली. तेव्हा तिला ही तीन वर्षांची चिमुकली तिच्या घरात भेदरलेल्या स्थितीत दिसली. तिच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिल्याचेही दिसत होते. ही तरुणी त्या चिमुकलीच्या आईची जवळची मैत्रीण असल्याने तिने याबाबतची तक्रार दामिनी पथकाकडे केली. पथकाने सिडको पोलिसांना सोबत घेत कदमच्या घरावर सोमवारी छापा मारला. त्यात कदम, रोपेकर यांच्यासह संशयीत आरोपी कृष्णा उत्तम कदम (३९, रा. रेणुकामाता मंदिरामागे, एन-९, सिडको), सचिन नारायण रुद्रकार (२०), अनिल श्रीरंग सुरडकर (२९), विकास पुंडलिक चव्हाण (२३, रा. हनुमाननगर, गारखेडा), प्रविण सुर्यभान बनसोडे (३२, रा. गल्ली क्र. २, हनुमाननगर) यांना अटक केली. त्यांच्याकडील २५ हजार पाचशे रुपये जप्त केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर बातमी....

बातम्या आणखी आहेत...