आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांचा चिमुकलीवर बलात्कार, मोबाइलचे आमिष दाखवून केला अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेलेल्या दहा वर्षांच्या चिमुकलीला मोबाइलचे आमिष दाखवून दोघांनी बलात्कार केला. रविवारी रात्री आठच्या सुमारास चिकलठाणा परिसरात ही घटना घडली. फारुख दौलत पठाण याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने फारुखला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
रविवारी घडलेल्या या प्रकाराबाबत मुलीच्या आईने सोमवारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, दहावर्षीय मुलगी रविवारी रात्री किराणा दुकानात गेली होती. तेव्हा तिच्या घराशेजारी राहणारा फारुख त्याच्या मित्राने तिला मोबाइल दाखवून जवळ बोलावले. मुलगी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तिला मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत दाखवली. चित्रफीत दाखवत त्यांनी तिला जवळच्या टेम्पोत नेऊन बलात्कार केला.

अल्पवयीन मुलाला पाठवले सुधारगृहात
या घटनेची माहिती पीडितेने कुटुंबीयांना दिली असता कुटुंबीयांनी सोमवारी सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत दोघांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ फारुखला अटक करून अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने अल्पवयीन बालकाची सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले, तर फारुखची पोलिस कोठडीत रवानगी केली. पुढील तपास उपनिरीक्षक विष्णू तांदळे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...