आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वो लोग गंदे हैं, दूसरे बच्चों के साथ भी गंदा काम करेंगे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "वो लोगगंदे हैं, दूसरे बच्चों के साथ भी गंदा काम करेंगे, उन्हें सजा दो इसलिए हम आपके पास आए हैं...’ असे जिन्सी लैंगिक छळ प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीने इन कॅमेरा जबाबात सांगितले. आठवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दोन तास तिने आपबिती सांगितली.
जिन्सीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये आठ वर्षांच्या बालिकेचा लैंगिक छळ झाल्याची घटना २८ दिवसांपूर्वी उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अरबी भाषेचा शिक्षक अहमद खान आमिर खान (३८, रा. मंजूरपुरा) काझी शमशोद्दीन (२८, रा. आलमगीर कॉलनी) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. १४ सप्टेंबर रोजी आठवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर तिने जबाब दिला. "तेखूपवाईट आहेत. इतर विद्यार्थिनींनाही ते त्रास देतील, त्यांना वाचवा’ अशी याचना पीडितेने केली. तिच्यासोबत काय घडले हेही तिने सांगितले. वरील दोन शिक्षकांएेवजी अजून काही रिक्षाचालकांबाबतही माहिती दिली. तिला रिक्षावाल्यांनीच रिक्षातून बाहेर नेले असा उल्लेखही तिने जबाबात केला. विशेष म्हणजे आतापर्यंत पोलिसांकडून न्यायाधीशांना मिळालेल्या माहितीत वरील दोन आरोपींची नावे होती. यात आणखी काही आरोपी आहेत याची माहिती नव्हती, असे सूत्रांनी सांगितले. जबाबाच्या वेळी न्यायाधीश, पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त कुणीही उपस्थित नव्हते. तपास अधिकाऱ्यांनाही बाहेर थांबण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह मंगल खिंवसरा. डॉॅ. मोनाली देशपांडे यांच्या पथकाने या मुलीचा जबाब नोंदवलेला आहे. या वेळी पीडित बालिकेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत जबाबात सांिगतले होतेे. दरम्यान, पोलिस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, डॉॅ. मोनाली देशपांडे यांच्या पथकाने याआधीही पीडित बालिकेचा जबाब नोंदवला होता. त्या वेळीही या बालिकेने आपल्यावरील अत्याचारांबाबत सांगितले होतेे.

चॉकलेटला घाबरली...
जबाबदेण्यासाठी आलेल्या या बालिकेला चॉकलेट देताच ती धास्तावली. चॉकलेट घेण्यास तिने नकारही दिला. मायेने समजूत घालत विश्वासात घेतल्यानंतर बऱ्याच वेळाने तिने चॉकलेट स्वीकारले. पाशवी अत्याचार करणाऱ्या नराधमांनी माझ्या तोंडात चॉकलेट कोंबले होते, असेही जबाब देताना तिने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...