आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुणवंत विद्यार्थिनीने आयुष्य संपवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सोळावर्षीय युवतीने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. कल्याणी भारतसिंग जाधव (१६, रा. मयूर पार्क, रामेश्वरनगर, हर्सूल) असे तिचे नाव आहे. ट्यूशन फीवरून तिचा वडिलांशी वाद झाला होता. त्यामुळे ती नैराश्यग्रस्त होती, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कल्याणीच्या कुटुंबाचे मयूर पार्क परिसरात दोन मजली घर आहे. त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्याचे काम सुरू असल्याने ते वरच्या मजल्यावर राहत होते. शुक्रवारी सकाळी कल्याणीने तळमजल्याच्या घराची आतून कडी लावली आणि छताच्या हूकला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारी कल्याणी दिसली नसल्याने वडिलांनी शोध घेण्यास सुरुवात केली. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी बराच वेळ दरवाजा वाजवला, परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. या वेळी कल्याणीचा मृतदेह लटकलेला आढळला. यासंदर्भात पोलिसांना कळवून तिला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हर्सूल पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. जे. बिघोत हेडकॉन्स्टेबल आर. बी. शेजूळ करीत आहेत.

दहावीत ९२ टक्के गुण
कल्याणीला दहावीत ९२ टक्के गुण मिळाले होते. तिने छत्रपती महाविद्यालयात ११ वीला प्रवेश घेतला होता. वडील सुरक्षा रक्षक आहेत. हे कुटुुंब आर्थिक तणावाखाली असल्याने कल्याणीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि, पोलिस आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...