आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विज्ञानाची गोडी, राज्यातील शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर उभारून त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति आवड निर्माण केली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे सेंटर उभारण्यात येणार असून यासाठी स्थानिक आमदारांच्या निधीतून मदत केली जाणार आहे.
शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक शिक्षकांना गणित आणि इंग्रजी विषयांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक अाणि संशोधन परिषदेतर्फे करण्यात येणार आहे. या योजनेनुसार शाळेच्या परिसरात किमान ५०० चौरस फुटांची खोली संबंधित शाळांमध्ये असणे आवश्यक आहे. मिनी सायन्स सेंटरसाठी शाळेत एक पूर्णवेळ विज्ञान शिक्षक आणि प्रयोगशाळा सहायकदेखील असायला हवा, असेही निर्णयात म्हटले आहे.
असे मिनी सायन्स सेंटर
या मिनी सायन्स सेंटरमध्ये अॅस्ट्रॉनॉमी, फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स असे वैज्ञानिक साहित्य असेल. हे साहित्य पाचवी ते दहावीच्या राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तकाशी संबंधित असेल. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत दहा टक्के वाढ करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाची असेल.
अशी होईल निवड
मिनी सायन्स सेंटरसाठी शाळा निवडीची प्रक्रिया जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सदस्य तर माध्यमिक शिक्षणाधिकारी सदस्य सचिव असतील. विद्यार्थिसंख्या जास्त असलेल्या अनुदानित शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेस सेंटरसाठी प्राधान्य दिले जाईल.
- ही योजना चांगली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळायला हवा.
बाळासाहेब चोपडे, विज्ञान शिक्षक, बाल विकास विद्यामंदिर
बातम्या आणखी आहेत...