आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील ७ तालुक्यांत ७० मिमीपेक्षा कमी पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यंदा मृग नक्षत्रात जोरदार हजेरी लावणारा पाऊस महिन्यापासून दडी मारून बसला आहे. लहरी मान्सूनचा हा खंड मराठवाड्याला दुष्काळाकडे नेणारा असल्याचे पावसाची आकडेवारी सांगते. निम्मा जुलै उलटून गेला तरी मराठवाड्यातील सात तालुक्यांत ७० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता सलग चौथ्या वर्षी खरीप हंगाम संकटात आला आहे. मात्र आपत्कालीन पीक नियोजनातून खरीप साधता येईल मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

या संदर्भात औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रातील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस.बी.पवार यांनी सांगितले, जूनच्या प्रारंभी चांगली हजेरी लावून पाऊस गायब झाला. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ येणार आहे. तर काही ठिकाणी अद्याप पेरणीच झालेली नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन, यंदा पीक नियोजन केल्यास खरीप हंगाम साधता येईल. यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, लवकर येणाऱ्या वाणांची निवड करणे, पावसाच्या आगमनानुसार पीक निवडणे व त्याप्रमाणे नियोजन कऱणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आंतरपीक म्हणून कापूस व तूर , बाजरी व तूर, एरंडी व तूर, धने, सूर्यफूल आदी पिकांचा विचार करावा.
आहे ती पिके अशी वाचवा
>हलकी मशागत करावी, झाडाच्या बुंध्याला माती लावावी, वखरणी, कोळपणी करावी
>पाणी उपलब्ध असेल तर एक संरक्षित पाणी ठिबक किंवा तुषार संचाने सकाळी किंवा सायंकाळी द्यावे
>१०० ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे
>फळ पिकांत आच्छादन करावे, पाणी असेल तरच बहार धरावा
>फळ पिकांसाठी ६ टक्के केओलिन (६०० ग्रॅम १० लिटर पाण्यात) मिसळून फवारणी करावी.
-डॉ. एस. बी. पवार, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय
कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सर्वात कमी पाऊस झालेले तालुके
बातम्या आणखी आहेत...