आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांचे बॅनर उतरले; बॉम्बे सर्कसचे चढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"डीबी स्टार'ने वृत्त प्रसिद्ध करताच काँग्रेस कार्यकर्ते किरण गिते आणि नंदकुमार नगरे यांनी पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानण्यासाठी लावलेले अनिधकृत पोस्टर काढून घेतले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही अनिधकृत होर्डिंग हटवले. मात्र, भाजपला अद्यापही सुबुद्धी आली नाही, तर दुसरीकडे बाॅम्बे सर्कसने शहरभर बेकायदा पोस्टर लावून घाण केली आहे.

अनधिकृत होर्डिंग आणि शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध "डीबी स्टार' वृत्तमािलका प्रसिद्ध करून मोहीम राबवत आहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांची दखल घेऊन अनेकांनी आपले होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर काढून घेतले. यामध्ये दोन्ही काँग्रेसचा समावेश आहे. मात्र, ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपच्या वृत्तीमध्ये अद्याप काहीही फरक पडलेला िदसत नाही. शिवाय बॉम्बे सर्कसने अवघे शहर रंगवून ठेवले आहे. ही सर्कस शहरवासीयांचे मनोरंजन कितपत करेल, हे सांगणे कठीण आहे, पण त्यांनी शहर नक्कीच घाण केले. उड्डाणपूल, पाणपोई, दुभाजक, पथदिवे, शासकीय कार्यालयाच्या भिंती इत्यादी दिसेल तिथे पोस्टर चिकटवले आहेत. यासंदर्भात बॉम्बे सर्कसच्या व्यवस्थापकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते उपलब्ध होऊ शकले नाही.

मी तरी काय करणार
भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याशी अनधिकृत बॅनरबाबत पुन्हा एकदा संवाद साधला असता, मी कार्यकर्त्यांना सातत्याने अनधिकृत पोस्टर, होर्डिंग न लावण्याच्या सूचना करत आहे. परंतु ते ऐकत नाहीत, मी तरी काय करणार, असे म्हणत त्यांनी जबाबदारी झटकली.