आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंद्रिय शेती उद्योगाचे क्लस्टर उभारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हिंदुस्थानी गाय ही अवघ्या जगाची माय आहे. तिचे वैज्ञानिक महत्त्व अमेरिकेसह युरोपीय देशांना पटल्याने भारतीय गोवंशावर तेथे मोठे संशोधन सुरू आहे. पण भारतात ते होत नाही. त्यासाठीच राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीसह त्यावर आधारित उद्योगांचे क्लस्टर उभारणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोवंश परिषदेच्या समारोपात केली.

बजाज उद्योग समूह इस्कॉनच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील दुसरी गोविज्ञान परिषद एमजीएम संस्थेच्या रुख्मिणी सभागृहात रविवारी झाली. यात सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत फक्त हिंदुस्थानी गाय आणि तिचे फायदे यावर अभ्यासपूर्ण चर्चासत्रे झाली. समारोप मुनगंटीवार यांनी केला. या वेळी ते म्हणाले, मी गेल्या १४ वर्षांपासून विधानसभेत गोवंश हत्याबंदी कायदा आणावा यासाठी भांडत होतो. तो कायदा अमलात आला आहे. गाय थकली तरी तिचे गोमूत्र आाणि शेणाला खूप महत्त्व आहे. त्यापासून अनेक उद्योग सुरू होऊ शकतात. अमेरिकेत भारतीय गायीवर संशोधन सुरू अाहे. सेंद्रिय उत्पादने महाग आहेत. ती स्वस्त कशी होतील यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीवर आधारित क्लस्टर तयार करणार आहोत.
गोिवज्ञान परिषदेत मार्गदर्शन करताना इस्कॉनप्रमुख गोरांगजी.
गोमूत्राच्या जागी डेटॉल
अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी गायीचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, कॅन्सरच्या रुग्णांना असह्य वेदना होतात. त्या सुसह्य होण्यासाठी त्याला गायीच्या गोठ्याजवळ ठेवले जाते. गोमूत्रात कॅन्सर बरा करणारा घटक आहे. तो शोधण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे. पूर्वी गोमूत्र हेच अँटिसेप्टिक म्हणून वापरले जायचे. आता त्याची जागा डेटॉल आणि लाइफबॉयने घेतली आहे.
गोरक्षकांचा सत्कार
राज्यभरातील शेतकरी सहकुटुंब या परिषदेला आले होते. शेतकऱ्यांनी गोमूत्र शेणापासून तयार उत्पादनांचे स्टॉल येथे लावले होते. राज्यभरातील गोशाळाचालक, नागरिक गोरक्षकांचा ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह भगवद््गीता देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आ. अतुल सावे यांची उपस्थिती होती.
व्याधीमुक्त करतो
मुनगंटीवार म्हणाले, मी शेतकरी कुटुंबातील आहे. मला एक कोट्यधीश मित्र भेटायला आला. त्याच्याकडे हेलिकॉप्टर आहे. पण त्याने माझ्यासाठी गोअर्क भेट म्हणून आणले. त्याने पंचवीस वर्षे निरोगी राहिल्याचे श्रेय गोअर्काला दिले. गायीसाठी जी मदत पाहिजे ती सरकार करायला तयार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
खासदार खैरे आणि उद्घाटन.....
यागोविज्ञान परिषदेचे उद्घाटन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार होते. सकाळी ९.३० ची वेळ होती. सनई-चौघडा वाजू लागला. गायवासराला ओवाळण्यासाठी जायचे होते. आमदार सावे वेळेवर पोहोचले, पण दहा वाजले तरी खैरे आले नाहीत. मग सावेंनीच गायींची पूजा केली. नंतर दीपप्रज्वलन करून त्यांनीच उद््घाटन केले. दुपारी अडीच वाजता खैरे आले तेव्हा मध्यान्ह झाली होती.