आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्मे मंत्रिमंडळ आज शहरात; भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवें चिरंजीवांचा विवाहसोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या चिरंजीवांचा विवाहसोहळा आणि शहरात आयोजित विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह राज्याचे जवळपास निम्मे मंत्रिमंडळ गुरुवारी (२ मार्च) शहरात येत आहे.
 
दानवे यांच्या चिरंजीवाचा विवाह सोहळा गुरुवारी संध्याकाळी ७.०१ वाजता जबिंदा इस्टेट, संग्रामनगर उड्डाणपूल, बीड बायपास रोड येथे होत आहे. यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दीपक केसरकर, विद्या ठाकूर आणि दिलीप कांबळे शहरात येत आहेत.

विवाह सोहळ्यापूर्वी सकाळी ११ वाजता होणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या आढावा बैठकीस राजकुमार बडोले, दिलीप कांबळे उपस्थित राहतील. सायंकाळी वाजता पोलिस आयुक्त कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. दुपारी वाजता सिडकोतील सहकारी बँकेत होणाऱ्या आढावा बैठकीस सुभाष देशमुख उपस्थित राहतील. दुपारी २.३० वाजता विष्णू सावरा हे सिल्लोड येथील लिटिल फ्लॉवर वंडर स्कूलला सदिच्छा भेट देतील.
 
 
सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात लातूर आणि औरंगाबाद कार्यक्षेत्राशी संबंधित विषयांवरील आढावा बैठक आणि दुपारी वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ च्या भूसंंपादनाच्या प्रलंबित बाबींसंदर्भात बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. 
बातम्या आणखी आहेत...