आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मोटारसायकलस्वाराची पादचारी कामगारास जोरदार धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- एका 13 वर्षीय अल्पवयीन मोटारसायकलस्वाराने पायी चालणार्‍या कामगारांना जोरदार धडक दिली. या अपघातात 23 वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला असून त्याचा सहकारी व मोटारसायकलस्वार जखमी झाले आहेत. त्या कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यावर शुक्रवारी (11 ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकानजीकच्या कारखान्यातून काम करून घराकडे पायी निघालेले राहुल परभत (23) व भोलाप्रसाद हरिनारायण प्रसाद (40) यांना भरधाव पाठीमागून आलेल्या अल्पवयीन मोटारसायकलस्वाराने (एमएच 20 बीबी 5318) जोरदार धडक दिली. यात दोन कामगार व स्वत: मोटारसायकलस्वार रस्त्यावर पडल्यामुळे जखमी झाले. राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात भोलाप्रसाद यांच्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मोटारसायकलस्वार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार एस. बी. सानप करीत आहेत.