आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीची सख्ख्या भावाविरोधात बलात्काराची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सख्ख्या भावाने बलात्कार केल्याची तक्रार एका मुलीने क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिली आहे. रेल्वेस्टेशन परिसरात बनेवाडी भागात राहणारी १४ वर्षांची मुलगी आठ दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. क्रांती चौक पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, परभणी येथील रेल्वे पोलिसांना ही मुलगी सापडली. त्यांनी ही माहिती क्रांती चौक पोलिसांना दिली. क्रांती चौक पोलिसांनी जबाब नोंदवल्यानंतर तिची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली. या पीडित मुलीला दोन भाऊ असून वडील मजुरी करतात. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाब घेतल्यानंतर ही बाब समोर आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.