अजिंठा - शेताच्या बांधावरून जात असलेल्या अल्पवयीन मुलीला ५५ वर्षीय नराधमाने मका पिकात ओढत नेऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना हट्टी येथे शुक्रवारी घडली.
हट्टी येथील तेरावर्षीय मुलगी गावालगत असलेल्या शेताच्या बांधावरून जाताना दुपारची सुनसान वेळ पाहून गावातीलच गफूरशहा मकबूलशहा याने अल्पवयीन पीडितेचे तोंड दाबून तिला मारहाण करत मकाच्या पिकात ओढत नेले व बलात्कार केला. या घटनेनंतर घटनास्थळी जमाव जमला होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी राम मांडुरके, सपोनि शंकर शिंदे घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. पीडित मुलीच्य आईने दिलेल्या फिर्यादीवरून अजिंठा पोलिस ठाण्यात गफूरशहा मकबूलशहा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचार केल्यानंतर पसार झालेल्या आरोपीस शोधण्यासाठी अजिंठा पोलिसांचे पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. पथकाने अजिंठा जंगालात आरोपीचा शोध घेतला. दरम्यान, आरोपी गफूरशहाने तिस-यांदा लग्न केलेले असून त्याची पार्श्वभूमी वादग्रस्तच असल्याची माहिती ग्रामस्थाकंडून मिळाली.