आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात भुरट्या चो-यांच्या प्रमाणात वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चोरी झाल्यानंतर ठाण्यात तक्रार देण्याइतका वेळ नागरिकांकडे नसल्यामुळे शहरातील उच्चभ्रू असलेल्या सिडको एन-1 मध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. केवळ रहिवाशांच्या उदासीनतेमुळे भुरट्या चोरांसाठी हा परिसर आश्रयस्थान ठरत आहे.


या परिसरात मोठमोठे बंगले आहेत. शेजारच्या बंगल्यात एखादी घटना घडली तर ती दुस-या दिवशी वर्तमानपत्राच्या माध्यमातून कळते. कोणी कोणाला बोलत नाही. कोणाचा कोणाशी संबंध नसलेल्या एन-1 साठी स्वतंत्र पोलिस चौकी आहे. चौकीत रात्रीच्या वेळी कोणीच नसतो. गस्तीचे प्रमाणही तसे फार कमी आहे. रात्री आणि दिवसा भुरटे चोर वसाहतीमध्ये टेहळणी करून लहान मोठ्या चो-या करतात. पण येथील रहिवासी कामाचा व्याप आणि पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून तक्रार देण्यास धजावत नाहीत. नेमका हाच फायदा चोरटे घेत आहेत.


तक्रारी येत नाहीत
तक्रारी आल्यानंतर कारवाई करू, मात्र आमचे कर्मचारी एन-1 भागात गस्त घालत असतात. चो-यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, भुरट्या चो-यांबद्दल आमच्याकडे तक्रारी येत नाहीत.
डॉ. गणपत दराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एम.सिडको


विद्युत मोटारी चोरीस
बंगल्याच्या परिसरातील दोन विद्युत मोटारी चोरीस गेलेल्या आहेत. बाहेरगावी जाताना आमचे सर्व लक्ष घराकडेच लागलेले असते.


आशिष वर्मा, नागरिक.
एका महिन्यात झालेल्या चो-या
विद्युत मोटारी 10
कारचे लोगो 5
विद्युत दिवे 29
नळाच्या तोट्या 19
कार टेप, स्पीकर 8
कारची चाके 2


चोरीचा प्रयत्न झाला
घरासमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून कारटेप चोरीचा प्रयत्न झाला. हा प्रकार 22 मार्च रोजी घडला. शिवाय 31 मार्चच्या रात्री पाच कारच्या काचा फोडून टेप लांबवण्यात आला. संरक्षण भिंतीच्या आत ठेवलेली कोणतीही वस्तू क्षणार्धात पळवली जाते. किरकोळ बाबतीत तक्रार करणे आवडत नाही. या भागात गस्त वाढवण्याची गरज आहे.
केतन नवले, बांधकाम व्यावसायिक.