आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्टेशन भागात दगडफेक, सहा वाहनांचेही नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अज्ञात तरुणांच्या टोळक्याने केलेल्या दगडफेकीत रेल्वे स्थानक भागात फॉर्च्युनरसह सहा गाड्यांच्या काचा फुटल्या. काही हॉटेल्सवरही त्यांनी दगड फेकले. गुरुवारी रात्री ९.३० वाजता घडलेल्या या प्रकाराने परिसरात काही काळ तणाव होता.

पोलिस येईपर्यंत टोळके पसार झाले. प्रत्यक्षदर्शींनुसार तोंडाला रुमाल बांधलेले, हातात काठ्या व दगड घेतलेले ८ ते ९ तरुण स्थानक भागातील कर्मचारी निवासस्थानाकडे घुसले. तेथे पार्क केलेल्या मोहंमद अब्दुल अलीम यांच्या फॉर्च्युनर कारवर त्यांनी दगडफेक केली. महेबूब खान यांनी आरडाओरड केल्यावर टोळके स्टेशनबाहेर आले. तेथे पुन्हा दगडफेक केली. त्यात लोडिंग रिक्षा (एमएच२०-८६७७), दोन स्विफ्ट कार (एमएच२०-बीएम ६०५३), (एमएच २० बीवाय ८६८५), इंडिगो (एमएच २०-बीसी ५०६७) आणि एका रिक्षाच्या काचा फुटल्या. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर दुकाने बंद झाली. अर्ध्या तासाने पोलिस आले. माजी महापौर गजानन बारवाल यांच्या आवाहनानंतर दुकाने सुरू झाली.