आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मम्मी...मम्मी, बर्थडे में मेरी सहेलियां और मेहमान क्यूं नहीं आए ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘मम्मी,मेरे बर्थडे में सहेलियां और मेहमान क्यूं नहीं आए?’ असा सवाल जिन्सीतील पीडित बालिकेने आपल्या आईला केला. या बालिकेचा शुक्रवारी नववा वाढदिवस होता. या कुटुंबावर ओढवलेल्या वाईट प्रसंगामुळे एरवी धूमधडाक्यात साजरा केला जाणारा वाढदिवस अगदीच साध्या पद्धतीने केला. यापूर्वी झालेले वाढदिवस आणि आजचे एकूणच वातावरण पाहून या बालिकेला आपल्या भावनांना आवर घालता आला नाही. ती आपल्या आईलाच म्हणाली, माझा वाढदिवस असा का बरे साजरा केला जात आहे? हे तिचे वाक्य ऐकून घरातील मंडळींना अश्रू अनावर झाले.
जिन्सीतील ग्लोबल स्कूलमध्ये शिकणारी आठवर्षीय मुलगी आणि तिचे कुटुंब लैंगिक अत्याचारामुळे त्रस्त आहे. कुटुंबात सर्वात लाडकी असल्यामुळे तिचा वाढदिवस दरवर्षी फंक्शन हॉलमध्ये धूमधडाक्यात साजरा व्हायचा. यानिमित्ताने तिचे चिमुकले मित्र, मैत्रिणी आणि पाहुणे मोठ्या प्रमाणात सहभागी होत असत. परंतु १७ दिवसांपूर्वी मानव जातीला काळिमा फासणाऱ्या घडलेल्या घटनेमुळे तिच्या घरात स्मशानशांतता आहे. सध्या ही पीडित भेदरलेली असल्यामुळे तिला आजीकडे ठेवण्यात आले आहे. तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. वाढदिवसानिमित्त शुक्रवारी आईने नवीन ड्रेस तेवढा घेतला. अशा वातावरणात वाढदिवस साजरा कसा करणार, असा प्रश्न या कुटंुबापुढे होता, म्हणून यंदा या चिमुकलीचा वाढदिवस अगदीच घरातल्या घरात करण्यात आला.

‘आमच्यावर जे संकट आले ते कधीच भरून निघणारे नाही. समाजाने आम्हाला साथ दिली पाहिजे. जी परिस्थिती आमच्यावर ओढवली ती आयुष्यात कुणावरही येऊ नये,’ अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आजीने व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...