आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mir Hidayat Selection In Municipal Corporation Aurangabad

महापौरांनी पाळला पालकमंत्र्यांचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडून स्थगिती तसेच राष्ट्रवादीकडून आक्षेप अशा परिस्थितीत प्रतीक्षा करणे अपेक्षित असताना महापौर कला ओझा यांनी काँग्रेस आघाडीचे पालिकेतील गटनेते म्हणून मीर हिदायत अली यांची नियुक्ती केली. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदेश दिल्यानेच ही नियुक्ती झाल्याचे शिवसेनेतील गोटाचे म्हणणे आहे, दुसरीकडे राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते अफसर खान यांनी अर्थपूर्ण नियुक्ती झाल्याची टीका केली.

अब्दुल साजेद यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीचे गटनेतेपद रिक्त होते. त्यावर हिदायत यांनी पूर्वीच दावा केला. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया झाल्याने त्यावर नंतर निर्णय होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून हिदायत पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी महापौरांकडे विनंती अर्ज केला. यावर निर्णय होणार असे समजताच राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते अफसर खान यांनी या पदावर दावा सांगितला. त्यांनी जैस्वाल यांच्या कानी हा प्रकार घातला. त्यामुळे सोमवारी जैस्वाल यांनी हे प्रकरण प्रलंबित ठेवण्याबरोबरच काँग्रेस आघाडीच्या सर्व सदस्यांनी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे सूचित केले होते. नियुक्तिपत्र देण्याचा अधिकार महापौरांना असल्याचे जैस्वाल ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले. तर, शिवसैनिक काँग्रेसमधील बाळासाहेबांचा आदेश पाळतील, असे वाटले नसल्याची टीका अफसर खान यांनी केली. दरम्यान, प्रकरण प्रलंबित पडले तर नियुक्ती अशक्य असल्याची जाणीव झाल्याने हिदायत यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क करून नियुक्तिपत्र देण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्याला सांगितले. त्यांच्या आदेशानंतर महापौर ओझा यांनी हिदायत यांना नियुक्तिपत्र दिल्याचे समजते.