आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीडितेला विकणाऱ्या मामासह चौघे अटकेत,अग्रवाल कुटुंबीयांची हर्सूूलमध्ये रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मिसारवाडीयेथील विवाहितेच्या छळप्रकरणाला आज कलाटणी मिळाली अाहे. पीडितेला विकल्याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचा मामा, मावशी आणि दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुवर्णा ऊर्फ शकुंतला वंजारे (मावशी), विठ्ठल पवार (मामा)रा. अंबेजाेगाई , धुराजी सूर्यनारायण , रा आंबेडकरनगर आणि सुरेखा बावणे (दलाल) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित सारिकाची काळजी घेण्याचा बनाव आरोपी काही दिवसांपासून करत होते. दोन दिवसांपूर्वी सारिकाची आई शहरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सारिकाला या आरोपींनी अग्रवाल कुटुंबीयांना सहा महिन्यांपूर्वी लाख २० हजार रुपयांत विकले होते, अशी माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे. दरम्यान , विवाहितेच्या अमानुष छळ प्रकरणात अग्रवाल कुटुंबातील पाच जणांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

अग्रवाला कुटुंबीयांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

अत्याचार कशासाठी ?
सारिकावरअमानुषपणे अत्याचार करण्याचे कारण काय, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. आरोपींच्या घरात काळी मांजर, कबुतर, पोपट, कुत्रे , वानर, कासव असे प्राणी आढळून आले.

रॅकेट असल्याचा संशय
या प्रकरणातील आरोपींचे एखादे रॅकेटच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिस उप निरीक्षक राजकुमार पाडवी पुढील तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...