आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मिसाइल मॅन' डॉ. कलाम यांना श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माँटेसरी बालक मंदिर शाळेत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करताना चिमुकल्या. छाया : मनोज पराती. - Divya Marathi
माँटेसरी बालक मंदिर शाळेत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करताना चिमुकल्या. छाया : मनोज पराती.
औरंगाबाद - ज्ञानक्षेत्रात भारताला एक नवे स्थान प्राप्त करून देणारे आणि मिसाइल मॅन असे नाव मिळवलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. शहरातही अनेक शाळांनी, संघटनांनी, राजकीय पक्षांनी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. देशाचे प्रेरणादायी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली गेली.
पँथर संघर्ष कामगार युनियन : कॅनॉटप्लेस परिसरामध्ये पक्षाचे नेेते लक्ष्मण भुतकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. या वेळी युनियनचे अध्यक्ष गोवर्धन बनसोडे, आनंद भुतकर, बबन बिराडे, जयमंगल साठे, अब्दुल अलीम, अशोक गवळी, अमोल भुतकर, रामदास बमणे, कपिल भुतकर, कल्याण सोनवणे, राजू वाघुले, कैलास तुपे, पुंडलिक पवार, गोरख गायकवाड यांची उपस्थिती होती.

मांशारदा शाळा : संस्थाचालकदिव्या रोकले यांच्या उपस्थितीत शिक्षक, विद्यार्थ्यांनी मौन बाळगून श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या कार्याविषयी माहिती देऊन शाळेच्य वतीने विज्ञान दिन साजरा करून श्रद्धांजली वाहिली.

माणिकचंदपहाडे विधी महाविद्यालय : महाविद्यालयाच्याविद्यार्थ्यांनी कलाम यांची २०१२ मध्ये दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यावेळी कलाम यांनी विद्यार्थ्यांना एक तास विधीक्षेत्र विद्यार्थ्यांची भूमिका यावर मार्गदर्शन केले होते. त्यावेळेसची चित्रफीत मंगळवारी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. प्राचार्य डॉ. सी. एम. राव यांनी कलाम यांनी दिलेली प्रतिज्ञा सांगितली. प्रा. श्रीकिशन मोरे दिनेश कोलते यांनी कलामांच्या आठवणी जागवल्या. .

महाराणाप्रताप हायस्कूल : मुख्याध्यापकपी. एम. शर्मा एम. जी. राठोड यांनी विद्यार्थ्यांना कलाम यांच्या कार्याची माहिती देऊन आदर्श घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सेंटजॉन हायस्कूल : संचालकजेम्स डोंगरदिवे, पल्लवी डोंगरदिवे,मुख्याध्यापिका मनवीन कौर पावा,आकाश सरकटे यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अशा थोर शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन त्यांच्यासारखे उत्तुंग काम केले पाहिजे,असे मत जेम्स डोंगरदिवे यांनी व्यक्त केले.

अखिलभारतीय िवद्यार्थी परिषद : एमआयटीमहाविद्यालय,सिडको येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. परिषदेच्या पुणे येथे झालेल्या कार्यक्रमातल्या कलाम यांच्या आठवणी जागवल्या.
शाळेच्य वतीने विज्ञान दिन