आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायब आधार कार्ड सापडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हजारो आधार कार्ड कचराकुंडीत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलिस आणि टपाल कार्यालयाने आधार कार्ड भरलेली एक बॅग हस्तगत केली. एका इसमाने ही बॅग पोलिसांच्या दिली.
बन्सीलाल नगरमध्ये 1 ऑगस्ट रोजी कचराकुंडीत हजारो आधार कार्ड असलेली बॅग आढळली होती. दोन मुलांनी कार्ड भरलेल्या बॅग कचराकुंडीत पाहिल्या होत्या, पण त्यानंतर बॅग गायब असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. ‘दिव्य मराठी’ने हे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी ती बॅग टपाल खात्याला दिली. आठ दिवसांपूर्वी टपाल कार्यालयाने बॅग हरवल्याची तक्रार दिली होती, पण हे कार्ड कचराकुंडीत कुणी व का टाकले ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.