आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राका क्लबमधील सीसीटीव्ही फुटेजची हार्ड डिस्क गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राका लाईफस्टाईलमधील मसाज पार्लरच्या कक्षातील डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर गायब असल्याचे सोमवारी (सहा जुलै) निदर्शनास आले. शनिवारी रात्री महापौर, उपमहापौर आयुक्तांनी क्लबला भेट दिली असताना मसाज पार्लर पाहयाला मिळाले होते. पार्लरच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आल्याचे दिसून आल्यावर तेथील फुटेज ताब्यात घेण्यात आले. हा डीव्हीआर मनपाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. आज महापौर उपमहापौरांनी त्यात काय आहे हे पाहण्यासाठी डीव्हीआर संगणकाला जोडल्यावर त्यातील हार्ड डिस्क गायब झाल्याचे आढळले. ही हार्ड डिस्क कधी गायब करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला असून मनपातून ती गायब झाली असल्यास इतर अनेक प्रश्न उभे राहात आहेत.
कराराचे उल्लंघन
१६आॅक्टोबर रोजी मनपा शलाका इंजिनिअर्स अर्थात सुनील राका यांच्यात ज्योतीनगरात मनपाच्या भुखंडावर बीओटीवर उभारावयाच्या स्पोर्टस क्लबबाबत करार झाला. या करारानुसार राका यांना स्विमींग पूल इतर सेवांसाठी इमारत बांधण्यासाठी २११४.७५ चौ. मिटर जागा देण्यात आली. त्यातील १८८.८६ चौ.मि. जागा तळमजल्यासाठी, स्टिल्ट मजल्यावर २३३.६० चौ. मि. जागा बांधकामासाठी निर्धारित करण्यात आली. प्रत्यक्षात या जागेशिवाय राका यांनी २३८.२५ चौरस मिटर जागा बळकावली. साइड मार्जिन, पार्किंग, दर्शनी भागासमोरील जागा, पहिल्या मजल्यावरील जागा असे मिळून ही जागा बिनदिक्कत पणे वापरण्यात आली. करारानुसार असे कोणतेही बांधकाम करता येत नाही. जेवढी जागा नमूद करण्यात आली आहे तेवढीच वापरणे बंधनकारक आहे. अग्निशमन दल, अॅम्ब्युलन्स आदी अत्यावश्यक सेवा सुरक्षेच्या इतर व्यवस्थांसाठी सोडण्यात आलेले साइड मार्जिन तर वापरताच येत नाही. येथे या बाबींचे साफ उल्लंघन करण्यात आले अाहे.
महापौर संतापले
राकायांनी याचिका दाखल केल्याचे समजल्यावर महापौर उपमहापौर अधिकाऱ्यांवर संतापले. महापौर म्हणाले की,त्याच दिवशी पंचनामे केले असते तर पुढील कारवाई मनपाला लगेच करता आली असती. पण राका यांना वेळ मिळावा म्हणूनच कारवाईला विलंब लावल्याचे दिसते. उपमहापौर राठोड म्हणाले की, मनपाने तातडीने कारवाई करीत पूल टेबल वगैरे जप्त करायला हवे होते. पण आपण त्यांना ते सगळे काढू दिले. ही दिरंगाई प्रशासनाने का केली याचे उत्तर मिळायला हवे.