आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवले ते सापडले...नीट पाहा, तो हुबेहूब आपलाच गजानन दिसतो!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद

- नीट पाहा. त्याचा चेहरा अगदी आपल्या गजाननसारखाच आहे.
- गजाननसारखाच दिसतोय अगदी हुबेहूब. तेवढ्याच वयाचा. केसांची ठेवण. अंगकाठी तीच. डोळेही पाहा नीट.
- अरे, हुबेहूब नाही. हा आपला गजाननच.
असा संवाद मंगळवारी ' दिव्य मराठी' तील बातमी वाचल्यानंतर औरंगाबादच्या गल्ली क्रमांक ३३, संजयनगर, बायजीपु-यातील सरजे कुटुंबात सुरू झाला आणि पाहता पाहता त्यांचे चेहरे उजळले. चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला गजानन राजस्थानातील हिंडोन गावात आढळल्याचे वाटून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांनी तातडीने सूत्रे हलवली. दिव्य मराठी कार्यालय गाठले.‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी त्यांचे थेट हिंडोनच्या सरपंचाशी बोलणे करून दिले. तेव्हा तो गजानन नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या आशा मावळल्या, मात्र पूर्णपणे संपल्या नाही. हिंडोनला जाऊन अधिक तपास करण्याची तयारी त्यांनी केली आहे.

नियतीच्या मनात नसले तर मृत्यूही येत नाही, याची प्रचिती देणारा प्रकार नुकताच हिंडोन येथे घडला. एका नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणा-या गोपाळ नावाच्या युवकाने घरच्या कटकटीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. आधी झोपेच्या गोळ्या, मग सल्फास नंतर दोन वेळा रेल्वे रुळावर झोपून त्याने मृत्यूला कवटाळण्याची धडपड केली. मात्र, तो सहीसलामत वाचला. त्याचे वृत्त ४ नोव्हेंबरला दिव्य मराठीने त्याच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केले.

ते पाहून सरजे कुटुंब आश्चर्यचकित झाले. घरातील सा-यांनी, आजूबाजूच्या लोकांनीही गोपाळचे छायाचित्र निरखून पाहिले. हा गोपाळ नव्हे आपला गजाननच आहे, असे त्यांना वाटू लागले. ६ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास गजानन घराबाहेर पडला होता. मद्याचे व्यसन असल्यामुळे त्याला काहीही बडबड करण्याची सवय होतीच. शिवाय तो नशेत यापूर्वीही भटकत होता. त्यामुळे तोच हिंडोन गावात पोहोचला असावा, असा सरजे कुटुंबाचा ग्रह झाला आणि त्यांच्या मावळलेल्या आशांना पुन्हा नवीन पालवी फुटली.

आशेच्या पालवीने साधला हिंडोनपर्यंत संपर्क
> हिंडोन गावापर्यंत पोहोचायचे कसे आणि तेथे संपर्क कसा साधावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी तत्काळ ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात धाव घेऊन आमच्या गजाननशी बोलणे करून द्या किंवा तेथील कुणाकडून खात्री करून द्या, अशी विनंती केली.
> ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी मंदार जोशी यांनी भास्कर वृत्तपत्र समूहाच्या जयपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधला. तेथून हिंडोनच्या प्रतिनिधीकडे विचारणा केली. तेव्हा गजानन आणि गोपाळ एकच व्यक्ती नसाव्यात, असे लक्षात आले.
> तरीही सरजे कुटुंबाने धीर सोडलेला नाही. शिरपूर किंवा हिंडोन येथे प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घेण्याची तयारी त्यांनी केली आहे.
मात्र, सरजे कुटुंब त्यांच्या तर्कावर ठाम होते. जोशी यांनी हिंडोनचे सरपंच बाबूसिंग यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. तेव्हा बाबूसिंग यांनी तो गजानन नव्हे, गोपाळच आहे. तो आमच्या गावात ४-५ वर्षांपासून राहतो. तो हिंडोनजवळच्याच शिरपूरचा रहिवासी असल्याचे ठामपणे सांगितले.