आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाट चुकलेली तरुणी कुटुंबीयांच्या स्वाधीन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रेम प्रकरणाला विरोध केल्याने पसार झालेल्या तरुणीला उस्मानपुरा पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. सातारा परिसरात शनिवारी ही घटना घडली.
सातारा येथील प्रियंका (नाव बदलले आहे) बारावीत एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तिचे एकाशी प्रेमसंबंध होते. सतत ती त्याच्याशी मोबाइलवर बोलत होती. तिच्या वडिलांनाही याबाबत शंका आली होती. त्यांनी प्रियंकाला याबद्दल खडसावलेही होते. शनिवारची सुटी असल्याने तिचे वडील घरात आराम करत होते. दुपारी 1 वाजता स्वयंपाकघराच्या दरवाजाने प्रियंका पसार झाली. ती घरात दिसत नसल्याने तिचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात झाली.
बराच वेळ झाला तरी प्रियंका सापडत नसल्याने तिचे वडील उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक संदिपान गवळी यांना प्रियंकाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवून घ्या, अशी विनंती केली तसेच मोबाइलवर आलेला मॅसेजही दाखवला. निरीक्षक गवळी यांनी मोबाइल नंबरचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक गिरिधर ठाकूर यांच्यावर सोपवली. त्यांनी मॅसेज आलेल्या मोबाइलवर फोन केला. हा मोबाइल तिच्या प्रियकराच्या मित्राने उचलला. पोलिस उपनिरीक्षक बोलतोय, असे म्हणताच प्रियकरासह त्याच्या मित्रांची धावपळ उडाली. मैत्रिणीच्या घरी आश्रयाला थांबलेल्या प्रियंकाने तोपर्यंत प्रियकराला अनेकदा फोन केले होते. पोलिसांचा फोन आल्यानंतर तिच्या प्रियकराच्या मित्राने पोलिसांना तिच्या मैत्रिणीच्या घराचा पत्ता सांगितला.
यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा तिला ताब्यात घेत कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. कोणतीही तक्रार न नोंदवता पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे या कुटुंबीयांचे डोळे
पाणावले होते.