आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता अल्पवयीन मुलीसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूरस्टेशन-  बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शिल्लेगाव पोलिसांनी चार महिन्यानंतर मोबाइल लोकेशनवरून शोध घेत नुकतेच आरोपीसह ताब्यात घेतले.मुलगी अल्पवयीन असल्याने व पालकांकडे जाण्यास नकार दिल्याने तिची रवानगी औरंगाबादच्या बालसुधारगृहात करण्यात आली असून आरोपीला अटक करून रविवारी न्यायालयात हजर करण्याार असल्याची माहिती सूर्यकांत कोकणे यांनी दिली. 
 
याप्रकरणी दिलेली अधिक माहिती अशी की, अशोक जैतमहाल यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोव्हेंबर २०१६ मध्ये शिल्लेगाव पोलिस ठाण्यात करत ती मुळे नामक युवकासोबत गेल्याचा संशय व्यक्त केला होता.
 
याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून शिल्लेगाव पोलिस मुलीचा शोध घेत होते. परंतू त्यांचे लोकेशन मिळत नव्हते. नुकतेच त्यांना लोकेशन ट्रेस झाले. तेव्हा ते गुजरात सीमेवर असलेल्या नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असल्याचे आढळले. अल्पवयीन मुलीने आरोपीशी लग्न केले असल्याचे सांगितले. 
 
याप्रकरणी पोलिस विनोद बिघोत, शेख युनूससह देवकी बाम्णावत यांचे पथक अक्कलकुवा येथे रवाना झाले. त्यांनी अल्पवयीन मुलगी व आरोपी प्रविण वाल्मिक मुळे यास शिललेगाव पोलिस ठाण्यात हजर केले. त्या वेळी मुलीने भितीपोटी पालकांकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीची रवानगी औरंगाबादच्या बालसुधारगृहात करण्यात आली असून आरोपी प्रवीण मुळे यास जेरबंद करण्यात आले आहे. 
 
त्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर करणार आहे. एकूणच त्यावेळी सैराट चित्रपटाची चलती असल्याने अशा चित्रपटाच्या क्रेझमधून अल्पवयीन मुलींना फुस लावण्याचे प्रकार होत असले तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काळे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...