आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातनिहाय सर्वेक्षणातील चुका आल्या समोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्यातीन वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक, आर्थिक जातनिहाय जनगणनेत नगर परिषद क्षेत्रातील १३५८ प्रगणक गटात इस्लाम धर्मातील १४५७ जणांची नोंदणी मुस्लिम जात म्हणून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याची दुरुस्ती करण्याचे काम सध्या करण्यात येत असून निम्म्या प्रकरणांत दुरुस्ती करून सॉफ्टवेअरमध्ये त्याची माहिती टाकण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक जातनिहाय जनगणनेत प्रगणकांनी केलेल्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात चुका झाल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते. त्यात दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या दुरुस्तीची यादी ऑनलाइन करण्यासाठी भेल कंपनीकडून शासनाने दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. यात पुन्हा चुका असल्याचे समोर आले. त्यामुळे यादी ऑनलाइन करण्याचे काम खोळंबले असून दुरुस्ती केल्यानंतरच ही यादी ऑनलाइन होईल. त्यानंतर जिल्ह्यातील सगळी माहिती समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती

हीगणना करण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यात सात हजार २०० प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. एका गटात १५० कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात शहरी आणि ग्रामीण अशी विभागणीही करण्यात आली आहे. शहर विभागातील शहराचे काम संपत आले असून काही नगर परिषदांच्या क्षेत्रातील १३५८ गटांत प्रगणकांनी चुकीची नोंद करून ठेवली आहे. त्यामुळे अंतिम काम संपवण्यास अडचण येत आहे.

दुरुस्तीचे काम सुरू
यादीतप्रगणकांनी केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. या चुका छोट्या असून दोन दिवसांत माहिती सॉफ्टवेअरमध्ये टाकण्यात येईल. संभाजीलांगोरे, संचालक
कशामुळे अडले यादीचे काम

नगरपरिषद क्षेत्रातील १४५७ कुटुंबांची नोंदणी प्रगणकांनी थेट मुस्लिम म्हणून केली आहे. त्यामुळे त्यांची जात कळत नाही. परिणामी सॉफ्टवेअर ही नावे समाविष्ट करण्यास परवानगी देत नाही. या कुटुंबांचा धर्म इस्लाम दाखवत आहे. मात्र, जात थेट मुस्लिम अशी नोंद आहे. यात दुरुस्ती करण्यात येत असल्याने मेहतर, मुजावर, तडवी, पिंजारी, फकीर आणि इतर जातींची माहिती समोर येत आहे.